..म्हणून शरद पवारांना अजूनही दौरे करावे लागतात, गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
शरद पवार यांचे कितीही दौरे झाले, तरीदेखील काही फरक पडणार नाही.
गणेश सोळंकी, Tv 9 मराठी, प्रतिनिधी, बुलढाणा : आमदार गोपीचंद पडळकर आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मेंढपाळ बांधवांच्या मेळाव्याला ते उपस्थित होते. यावेळी पडळकर म्हणाले, पन्नास वर्षात राष्ट्रवादीला कधी तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाही. आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य केलं. राज्यात गेल्या 40-50 वर्षापासून राष्ट्रवादीला स्वबळावर तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाही. विश्वासघात न करता, कुणाच्या पाठीत खंजीर न खूपसता त्यांना कधी मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, अशी टीका त्यांनी केली.
राष्ट्रवादीला आता दौरे करत बसावं लागतं. शरद पवार यांचे कितीही दौरे झाले, तरीदेखील काही फरक पडणार नाही. राष्ट्रवादी पक्ष नको असं म्हणणाऱ्या युवकांची फळी राज्यात निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारीपणाला यांच्या जातीवादीपणाला आणि यांच्या विश्वासघातीपणाला राज्यातील लोकांनी कायम नकार दिला आहे. पुढेही देतील, असंही आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. ते मेंढपाळ बांधवांच्या मेळाव्याला बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.
छगन भुजबळ यांनी सरस्वती व शारदा मातीचे फोटोची शाळेमध्ये काय गरज, असे विधान केलं होतं. त्यानंतर त्यावरही पडळकर यांनी उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता कुठलंही काम राहिलेले नाही. त्यामुळं काहीतरी वाद उफाळण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात आहे. त्याला राज्यातील जनता फार महत्त्व देत नाही असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीमागून देशात अनेक लोकं आली. ममता बॅनर्जी स्वतःच्या भरोशावर मुख्यमंत्री झाल्या. मायावतीही मुख्यमंत्री झाल्यात. जगनमोहनसारखा नवीन चेहरा समोर आला. अरविंद केजरीवाल यांनी एकहाती सत्ता आणली.
राष्ट्रवादीच्या नेत्यांना काही कामं शिल्लक राहिले नाही. नवीन वाद उखरायचं काम सुरू आहे. भाजपचा मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा हे देशात भाजपचं नेतृत्व करतात.