मोठी बातमी ! मविआ 2024मध्ये एकत्र लढेल हे आताच कसं सांगू?; शरद पवार यांच्या विधानाने कुणाला टेन्शन?

अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जेपीसी हा पर्याय नाही. 21 लोकांच्या जेपीसीत भाजपचे 15 लोक असतील तर विरोधक फक्त 6 असतील. त्यामुळे चौकशी व्यवस्थित होणार नाही. जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाची समिती प्रभावी चौकशी करेल, असा पुनरुच्चार पवार यांनी केला.

मोठी बातमी ! मविआ 2024मध्ये एकत्र लढेल हे आताच कसं सांगू?; शरद पवार यांच्या विधानाने कुणाला टेन्शन?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 9:53 AM

विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, अमरावती : येत्या 2024मध्ये भाजपला प्रखर विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीने राज्यभरात वज्रमूठ सभांचे आयोजन केले आहे. तिन्ही पक्षांचे नेते या सभांना संबोधित करत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. येत्या 1 मे रोजी मुंबईतही वज्रमूठ सभा होत असून या सभेला पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हजेरी लावणार आहेत. मात्र, त्याआधीच शरद पवार यांनी एक बॉम्ब टाकल्याने खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठच सैल होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तर आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटाला टेन्शन येण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना धक्कादायक विधान केलं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र मिळून 2024ची निवडणूक लढणार आहे काय? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर सर्वांच्याच भुवया उंचावणारं होतं. आम्ही एकत्र लढणार. आज आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण इच्छाच पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यातील काही इश्यू महत्त्वाचे असतात. त्यावर अजून चर्चा झाली नाही. त्यामुळे 2024मध्ये आघाडी एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगू? असं शरद पवार म्हणाले. पवार यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

कर्नाटकात एकत्र लढणार?

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे वंचित आघाडी महाविकास आघाडीत येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यावर पवार यांना विचारण्यात आलं असता महाविकास आघाडीत येण्याबाबत वंचित आघाडीशी आमची चर्चा झाली नाही. वंचित आघाडीसोबत चर्चा झाली ती फक्त कर्नाटकातील मर्यादेत जागेबाबत. त्याशिवाय दुसरी कसलीही चर्चा झाली नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकत्र लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

कुणाशीही चर्चा नाही

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरही पवार यांनी भाष्य केलं. त्यांच्या स्टॅटेजीनुसार ते फोडाफोडीचं काम करत असतील. आम्हाला भक्कमपणाने भूमिका घ्यावी लागेल. त्यावर आज सांगणं योग्य नाही. कारण आम्ही या संदर्भात कुणाशी चर्चा केली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.