“या पृथ्वीवर माझ्या नावावर एकही घर नाही, त्यामुळे ईडी चौकशीचे काहीच वाटत नाही”; राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपला खोचक टोला
सध्याचे राजकारण बदललेले असल्याचे सांगत ईडीची भीती घालून अनेक राजकीय नेत्यांचे अस्तित्व धोक्यात आणले असल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
सांगली : देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून ईडीकडून नेत्यांची होणाऱ्या चौकशीवरून विरोधकांकडून भाजपवर सातत्याने टीका केली जात आहे. त्यावरूनच विरोधकांकडूनही सत्ताधारी भाजपवर काही नेत्यांकडून खोचकपणे टीकाही केली जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशा अनेक पक्षातील नेत्याना ईडीकडून नोटीस बजावून त्यांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आणले जात होते. ईडीकडून टाकल्या जाणाऱ्या आणि बजावण्यात येणाऱ्या नोटीसमुळे अनेक नेत्यानी पक्षांतरही केले आहे.
या साऱ्या प्रकारावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपला टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी बोलताना आणि भाजपला टोला लगावताना म्हटले आहे की, मी कोणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत, त्यामुळे मला रात्री शांत झोप लागते.
तसेच या पृथ्वीवर माझ्या नावावर एकही घर नाही. त्यामुळे ईडी चौकशीचेही आपल्याला काहीच वाटत नाही असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.
नेर्ले (ता. वाळवा) येथील विकास सोसायटीच्या इमारतीचे उद्घाटन करताना जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सरपंच संजय पाटील, सोसायटीचे अध्यक्ष दिलीप पाटील हेही उपस्थित होते.
आमदार जयंत पाटील यांनी आजच्या कार्यक्रमातून भाजपला ईडीच्या नोटीसवरून जोरदार टोलेबाजी केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, या पृ्थ्वीवर माझ्या नावावर एकही घर नाही.
माझ्या नावावर घर नसल्यामुळे ईडीची चौकशी लागण्याचीही शक्यता नाही असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपच्या राजकारणावरही सडकून टीका केली आहे.
सध्याचे राजकारण बदललेले असल्याचे सांगत ईडीची भीती घालून अनेक राजकीय नेत्यांचे अस्तित्व धोक्यात आणले असल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
जयंत पाटील यांच्या ईडीवरून चाललेल्या टोलेबाजीवरून भाजप आणि राष्ट्रवादीचे वाकयुद्ध रंगणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात आता जयंत पाटील यांच्या टीकेला भाजप काय उत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.