जगातील सर्वांत उंच ‘भगवा ध्वज’ उभारण्याचा रोहित पवार यांचा संकल्प, मुहूर्तही ठरला!

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात देशातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून रोहित पवार यांनी परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प केला आहे.

जगातील सर्वांत उंच 'भगवा ध्वज' उभारण्याचा रोहित पवार यांचा संकल्प, मुहूर्तही ठरला!
Rohit Pawar
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 1:44 PM

अहमदनगर : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात देशातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. या स्वराज्य ध्वजाची दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 15 ऑक्टोबरला प्रतिष्ठापना करणार आहे. तर आज कर्जतचे ग्रामदैवत गोधड महाराजांच्या मंदिरापासून देशातील विविध भागात ‘स्वराज्य ध्वज पूजन’ यात्रा निघालीये.

90 किलो वजन, 74 ठिकाणी पूजन, ध्वजाचा 12 हजार किमी प्रवास

74 मीटर उंचीचा भव्य-दिव्य भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे. या ध्वजाचा आकार 96X64 फूट असून वजन 90 किलो आहे. विशेष म्हणजे हा ध्वज देशातील 74 ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार असून 6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटर असा सलग 37 दिवस या ध्वजाचा प्रवास होणार आहे.

महाराष्ट्राच्या पावन भूमीत देशातील नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज उभारणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवानेते आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेने लोकसहभागातून आणि सहकार्यातून ‘स्वराज्य ध्वज पूजन यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे.

भुईकोट किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखलं

निजामाविरुद्ध हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला ती पावन भूमी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्टण म्हणजेच खर्ड्याच्या भुईकोट किल्ला… याच किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून रोहित पवार यांनी परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकार होत असून त्यावर प्रेरणा, ऊर्जा देणारा ७४ मीटर उंचीचा भव्य-दिव्य असा भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे.

भगवा रंग कुणाचा नाही, तो मानवतेचा आणि एकतेचा

“भगवा ध्वज हा आपल्या सर्वांचाच अभिमान, सर्वस्व आणि स्फूर्तिस्थान आहे. भगवा रंग हा कोणा एकाचा नव्हे तर तो सर्वांचा असून समानतेचा, एकीचा संदेश देणारा आहे. पाली वाङ्मयात अनेक ठिकाणी सर्वगुणसंपन्न गौतम बुध्दांना उद्देशून ‘भगवा’ शब्द आला आहे. सहिष्णुतेची शिकवण देणाऱ्या वारकरी संप्रदायाने खांद्यावर जी पताका घेतली तीही भगव्याचीच छटा असलेल्या काव रंगातली.”

जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज उभारण्याचा रोहित पवार यांचा संकल्प

“शीख धर्मामध्ये त्यागाचे आणि चैतन्याचे प्रतिक आहे भगवा रंग, पगडीचा सर्वसामान्य रंगही भगवाच, पिवळ्या रंगाची सावली जिला बसंती म्हणतात ती भगव्याचीच छटा आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ मध्ये झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६X६४ फूट असून वजन ९० किलो आहे. हा राज्यातीलच नाही तर जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज असणार आहे”, अस रोहित पवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

दसऱ्याच्या मुहूर्तावर ध्वजाची प्रतिष्ठापना

दसऱ्याच्या मुहूर्तावर या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रासह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड), आग्रा किल्ला(उत्तर प्रदेश), अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा 74 ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. त्यासाठी 6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटर असा सलग 37 दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. निरंतर बदलते जग आणि तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव या सर्वांमध्ये आपल्या परंपरा जपून त्यांना पुढे नेण्याची गरज आहे.

या कार्यक्रमाचा प्रारंभ 9 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता कर्जत येथील संतश्री गोदड महाराज यांच्या मंदिरातील पूजेने होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर नेऊन तिथंही पूजा केली जाईल.

(NCP MLA Rohit Pawar determination to raise the world tallest saffron flag)

हे ही वाचा :

छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून मुक्तता!

राज्यातील कीर्तनकारांना कोरोना काळात ‘अच्छे दिन’, महिन्याला 5 हजार मिळणार, ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.