शरद पवार यांच्या प्रेमापोटी, कार्यकर्त्यांनी घेतला हा निर्णय; पदाधिकारी म्हणतात….

शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही धक्का बसला आहे. त्यांच्या या निर्णयामुळेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सध्या राजीनामा सत्र सुरुच ठेवले आहे.

शरद पवार यांच्या प्रेमापोटी, कार्यकर्त्यांनी घेतला हा निर्णय; पदाधिकारी म्हणतात....
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 11:49 PM

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील वातावरण प्रचंड ढवळून निघाले आहे. शरद पवार यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसह राज्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार जर आपल्या निर्णय मागे घेत नसतील तर आमचेही राजीनाने घ्या अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यासाठी भलीमोठी रांग लावली आहे.

शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे व्यथित होऊन चंद्रपूर जिल्ह्यातही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शरद पवार यांच्या निवृत्तीमुळे आता राष्ट्रवादीती वातावरण प्रचंड तापले आहे.

त्यांच्या या निर्णमामुळे आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या नेत्यांना आपले अश्रू अनावर झाले आहेत. त्यामुळे आता राज्यातील वेगवेगळ्या भागातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवा केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

शरद पवार अध्यक्ष नसतील तर राष्ट्रवादी पक्षाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतील म्हणून त्यांनी राजीनामा परत घ्यावा अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.

शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही धक्का बसला आहे. त्यांच्या या निर्णयामुळेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सध्या राजीनामा सत्र सुरुच ठेवले आहे.

शरद पवार यांनी आज निवृत्तीची घोषणा केली असली तरी त्यांच्या या निर्णयाचे भविष्यात काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.