“सर्व्हेनुसार मुख्यमंत्री शिंदे यांना पसंदी असेल तर भाजपने त्यांचेच ऐकावे”; राष्ट्रवादीनं भाजप-शिवसेनेच्या जागांवरून टोला हाणला

शिंदे आणि फडणवीस सरकारकडून एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंदी असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या जाहिराती आज सगळीकडेच झळकल्या आहेत.

सर्व्हेनुसार मुख्यमंत्री शिंदे यांना पसंदी असेल तर भाजपने त्यांचेच ऐकावे; राष्ट्रवादीनं भाजप-शिवसेनेच्या जागांवरून टोला हाणला
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 5:24 PM

सांगली : आगामी काळातील निवडणुकांसाठी आता राष्ट्रीय पक्षासह प्रादेशिक पक्षांनीही आता चाचपणी सुरु केली आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चेना उधान आले आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही आपापल्या हक्काच्या जागांवर दावा करत मित्र पक्षासह विरोधकांच्या मतदारसंघावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राजकीय सर्व्हेनुसारही आता दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे. जो सर्व्हे केला गेला आहे, त्या सर्व्हेमध्ये जर एकनाथ शिंदे यांच्या बाजून सर्व्हे आला असेल तर भाजपने विचारपूर्वक निर्णय घेऊन, एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करायला हवे असा टोला त्यांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जर सर्व्हे आला असेल तर भाजपनेही त्यांचे नेतृत्व मान्य केले पाहिजे. तसेच ते ज्या जागांवर दावा करत असतीर त्या जागा त्यांना दिल्या पाहिजेत असं मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व्हेनुसार मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना अधिक पसंदी असेल,तर भाजपाने त्यांचे ऐकावे,आणि शिंदेंना भाजपाने पूर्ण नेतृत्व द्यावं असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

त्यांच्या पक्षाने 70 ,80,90 जागा मागितली आहेत, त्यांना तेवढ्या द्याव्यात,अशी आमची उपसूचना असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

शिंदे आणि फडणवीस सरकारकडून एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंदी असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या जाहिराती आज सगळीकडेच झळकल्या आहेत.

त्यावरून जयंत पाटील यांनी हा टोला लागावला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावताना म्हटले आहे, एकनाथ शिंदे यांना सर्व्हेमध्ये जर जास्त पसंदी असेल तर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून ते भाजपनेही मान्य केले पाहिजे असा टोला त्यांनी लगावला आहे.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.