Raigad Taliye Landslide: तळीये गावात NDRFसह हेलिकॉप्टर पोहोचलं, पण लँडिंगसाठी जागाच मिळेना; मदतकार्यात खोळंबा
महाडच्या तळीये मधलीवाडी गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. काल ही घटना घडल्यानंतर आज सकाळी एनडीआरएफची एक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. (Mahad landslinde)
महाड: महाडच्या तळीये मधलीवाडी गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. काल ही घटना घडल्यानंतर आज सकाळी एनडीआरएफची एक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. दुसरी टीमही हेलिकॉप्टरने तळीयेला पोहोचली आहे. मात्र, तळीयेमध्ये गेल्या अर्ध्या तासांपासून हेलिकॉप्टरला लँडिंगसाठी जागाच मिळत नसल्याने मदत कार्यात मोठा खोळंबा होत आहे. (ndrf team could not reach at mahad because of flood, says Nidhi Chaudhary)
रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या दुर्घटनेची माहिती दिली. यावेळी त्यांनी मदत कार्यात येत असलेल्या अडथळ्याचीही माहिती दिली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफची एक टीम आज सकाळी तळीयेमध्ये पोहोचली. एनडीआरएफला हेलिकॉप्टरच्या मदतीने मुंबईहून एअर लिफ्ट करण्यात आलं आहे. हेलिकॉप्टर तळीयेमध्ये पोहोचलं आहे. मात्र, लँडिंगसाठी जागा शोधत आहेत. अर्धा तासापासून जागा शोधली जात आहे. लँडिंगसाठी जागा मिळताच ही टीम उतरून मदतकार्यास सुरुवात करेल, असं निधी चौधरी यांनी सांगितलं.
म्हणून मदत पोहोचली नाही
ही काल संध्याकाळची घटना आहे. या घटनेनंतर एनडीआरएफला तात्काळ फोन करण्यात आला होता. तसेच हेलिकॉप्टरसाठीही प्रशासनाने खूप प्रयत्न केले होते. पण हेलिकॉप्टर संध्याकाळी आणि रात्री उडू शकत नसल्याने हेलिकॉप्टरच्या मदतीने घटनास्थळी मदत पोहोचवता आली नाही. आता अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि एनडीआरएफची टीम पोहोचली असून ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. महाडला जाणारे सर्व मार्ग बंद झालेले होते. दरडी कोसळल्याने आणि पाण्यामुळे हे मार्ग बंद झाले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
30 लोक अडकल्याची शक्यता
प्राथमिक माहितीप्रमाणे स्थानिक नागरिकांच्या मदतीने 32 मृतदेह काढण्यात आले आहेत. तसेच जवळपास 30 लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. चिखल आणि पाण्यामुळे जाण्याचे सर्व मार्ग बंद होते. आता मार्ग मोकळे करण्यात आले आहेत. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
नेमकं काय काय घडलं?
महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. तुफान पावसामुळे काल, गुरुवार (22 जुलै) संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास या गावावर दरड कोसळली आहे. गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी आतापर्यंत मातीच्या या ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृतदेह बाजूला काढले आहेत. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, या ढिगाऱ्याखाली आणखी 40 ते 45 मृतदेह अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. (ndrf team could not reach at mahad because of flood, says Nidhi Chaudhary)
संबंधित बातम्या:
Raigad Satara landslide live : रायगड आणि साताऱ्यात भीषण दुर्घटना, दरडी कोसळून 50 पेक्षा अधिक मृत्यू
Raigad Talai Landslide | रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू, तळई गावात भीषण दुर्घटना
(ndrf team could not reach at mahad because of flood, says Nidhi Chaudhary)