मोठी बातमी ! 11 ते 13 मे दरम्यान फडणवीस यांना धक्का बसेल अशा घटना घडणार; सुषमा अंधारे यांचा मोठा दावा
राणेंची पोरं काही खूप बोलत आहेत. राणे साहेबांच्या मुलांना काहीही बोलावसं वाटत नाही. त्यांची दखल घ्यावीत असे ते नाहीत. आम्ही राणेंच्या मुलांना फार सीरिअस घेत नाही, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
महाड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपालांकडे डिनर डिप्लोमसीला जाऊन आले. त्याकडे दुर्लक्ष करू नका. यातून बरेच राजकीय संकेत येतात. येत्या 11 ते 13 मे दरम्यान राज्यात काय होईल ते सांगता येणार नाही. डिनर डिप्लोमसीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धक्का लागला तरी आश्चर्य वाटणार नाही, असं मोठं विधान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा येण्यासाठी आटापिटा करत आहेत. फडणवीसांच्या उठाठेवीमुळे पक्षाची इमेज खराब झाली आहे. शिंदेशी हातमिळवणी केल्यामुळे पक्षांची इमेज खराब झाली आहे, असा दावाही सुषमा अंधारे यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकात एका रॅलीला संबोधित केलं होतं. मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतच असतो. कसा येतो हे तुम्हाला माहीत आहे, असं विधान फडणवीस यांनी केलं होतं. या विधानावरून सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांची फिरकी घेतली. फडणवीस पुन्हा येईन म्हटले होते. ते आले. एकदा विरोधी पक्षनेते म्हणून आणि दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून आले. फडणवीस यांच्या विरोधात दिल्लीश्वरांचा गट इथे सक्रिय आहे. त्यामुळे फडणवीस पुढील काळात येतील पण विरोधी पक्षांचे नेते म्हणून, असा चिमटा सुषमा अंधारे यांनी काढला.
राणेंना गांभीर्याने कसं घ्यायचं?
यावेळी त्यांनी भाजप नेते नितेश राणे यांना फटकारलं. नितेश राणेंविषयी काहीही बोलावसं वाटत नाही. राणेंना गांभीर्यानं कसं घ्यायचं? त्यांना बारसूत हिंग लावूनही लोकांनी विचारलं नाही, असा खोचक टोला अंधारे यांनी लगावला.
कोकण शिवसेनेचाच गड
रायगड, कोकण हा शिवसेनेचा गड आहे. रायगडने ठाकरे आणि शिवसेनेला भरभरून दिलं आहे. बऱ्याचशा समीकरणाची उकल होणार आहे. स्नेहल जगतापच्या पाठीशी उद्धव ठाकरेंची ताकद उभी आहे. कुणाला दाखवायची म्हणून आमची सभा नाही. बारसू आंदोलकांसाठीची ही सभा आहे, असं त्या म्हणाल्या.
अमराठींच्या जमिनी
बारसूत गुप्ता नावाच्या अधिकाऱ्याकडे 92 एकर जमीनी आहेत. बारसूत आशिष देशमुखांची 18 एकर जमीन आहे. बारसूतील सगळी नाव अमराठी आहेत. कोकणवासियांना हुसकावून लावण्याचा चंग बांधला आहे. या भूमिकेतून बारसू प्रकल्पग्रस्तांना भेटण्यासाठी गेले. आम्ही तुमच्या लढाईत सोबत असल्याचं सांगितलं