नीलेश लंके यांचे उपोषण, आई शकुंतला लंके यांच्या डोळ्यात अश्रू

या आंदोलनामुळं तीन किलो वजन कमी झालं. तो स्वतःच्या जीवावर उदार आहे.

नीलेश लंके यांचे उपोषण, आई शकुंतला लंके यांच्या डोळ्यात अश्रू
शकुंतला लंके
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 9:05 PM

अहमदनगर : गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांचे उपोषण सुरू आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचं बांधकाम त्वरित सुरू व्हावं, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी लंके यांच्या आई शकुंतला लंके मुलाला भेटावयास आल्या. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. लंके यांच्या आई म्हणाल्या, तीन दिवसांपासून माझ्या मुलानं अन्नाचा कण घेतला नाही. त्यानं पाणी घेतलं नाही. त्यामुळं मलाही रात्रभर झोप येत नाही. तरीही सरकार या आंदोलनाची दखल घेताना दिसत नाही.

रात्री दोन-तीन वाजता घरी येतो. आंघोळ करतो. परत सकाळी सहा वाजता उठतो. समाजासाठी तो हे सारं करतो. आम्हाला रात्रभर झोप येत नाही. पण, सरकार दखल घेत नसल्याचंही लंके यांच्या आईचं म्हणणंय.

या आंदोलनामुळं तीन किलो वजन कमी झालं. तो स्वतःच्या जीवावर उदार आहे. पण, हे सारं समाजसेवेसाठी करत असल्याचं लंके यांच्या आईनं म्हंटलंय. माझं स्वतःचं काहीही झालं तरी चालेल. पण, मी माघार घेणार नाही, असा त्याचा स्वभाव आहे. सरकार माझ्या मुलाचा काही विचार करत नाही. त्यामुळं काय सांगणार, असंही त्या म्हणाल्या.

कालही काही निर्णय झाला नाही. त्यामुळं मला दोन दिवसांपासून झोप लागत नाही. पण, सरकार निर्णय घेत नसल्यानं खंत व्यक्त केली.

नीलेश लंके म्हणाले, आम्ही समाजासाठी आंदोलन करत आहोत. आपला मुलगा तीन दिवसांपासून उपाशी असल्यानं आईला वाईट वाटणार हे स्वाभाविक आहे. ज्यासाठी लढाई उभारली त्यात यश मिळालं पाहिजे. ४६७ लोकांचा अपघाती मृत्यू झाला. हजारो लोकं अपंग झाले. नगर-शिर्डी रस्त्यावर दोनशे ते अडीचशे लोकं मृत्यूमुखी पडले. त्यांना न्याय देण्याची हीच वेळ आहे.

Non Stop LIVE Update
“शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार अन्...”, कंगना रणौतचं वक्तव्य
“शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार अन्...”, कंगना रणौतचं वक्तव्य.
पंढरपुरात पुन्हा पूरस्थिती, चंद्रभागा नदीवरील पूल अन् मंदिर पाण्याखाली
पंढरपुरात पुन्हा पूरस्थिती, चंद्रभागा नदीवरील पूल अन् मंदिर पाण्याखाली.
जाऊ दे मरू दे तिला तू कशाला..मनसे नेत्याकडून आव्हाडांची ती क्लिप ट्वीट
जाऊ दे मरू दे तिला तू कशाला..मनसे नेत्याकडून आव्हाडांची ती क्लिप ट्वीट.
शिंदे गटातील नेत्याच्या 'त्या' वक्तव्यावर अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
शिंदे गटातील नेत्याच्या 'त्या' वक्तव्यावर अमृता फडणवीस काय म्हणाल्या?.
मग नैतिकतेच्या ढोंगी गप्पा.., महिला अत्याचारावरून राऊतांची भाजपवर टीका
मग नैतिकतेच्या ढोंगी गप्पा.., महिला अत्याचारावरून राऊतांची भाजपवर टीका.
निवडणुकीपूर्वी रोहित पवारांना धक्का,आरोप करत ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा
निवडणुकीपूर्वी रोहित पवारांना धक्का,आरोप करत ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा.
नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाणांचं वयाच्या 64 व्या वर्षी निधन
नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाणांचं वयाच्या 64 व्या वर्षी निधन.
बीड-परळी महामार्गावरील पूल गेला वाहून, 48 तासांपासून वाहतूक ठप्प अन्..
बीड-परळी महामार्गावरील पूल गेला वाहून, 48 तासांपासून वाहतूक ठप्प अन्...
विधानसभेसाठी 'मविआ'चा फॉर्म्युला ठरला? कसं असणार मुंबईचं जागावाटप?
विधानसभेसाठी 'मविआ'चा फॉर्म्युला ठरला? कसं असणार मुंबईचं जागावाटप?.
'मी कर्ज काढून बंदुका देणार', शिंदे नेत्याचं महिलांसाठी अनोखं फर्मान?
'मी कर्ज काढून बंदुका देणार', शिंदे नेत्याचं महिलांसाठी अनोखं फर्मान?.