Nitesh Rane on MIM : त्यांच्या घरात कोण कोणाबरोबर झोपतो, MIM च्या प्रस्तावावर बोलताना नितेश राणे भलतेच बोलले

MIM ने लग्नाचा प्रस्ताव तिघांना द्यावा, त्यांनी लग्न करावे, हनीमून करावे हा त्यांचा आपापसातला प्रश्न आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची यावर तिखट प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

Nitesh Rane on MIM : त्यांच्या घरात कोण कोणाबरोबर झोपतो, MIM च्या प्रस्तावावर बोलताना नितेश राणे भलतेच बोलले
भाजप आमदार नितेश राणेंची महाविकास आघाडीवर टीकाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 3:20 PM

उस्मानाबादः आगामी निवडणुकांमध्ये MIM महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) येऊ शकते, असा प्रस्ताव खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिलाय, त्यावर भाजपने आघाडीतील तिन्ही पक्षांची चांगलीच खिल्ली उडवणं सुरु केलं आहे. यातच भाजप नेते नितेश राणे यांनी भलतेच वक्तव्य केले आहे. नितेश राणे (Nitesh Rane) हे आज सह कुटुंब तुळजापूरमधील भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले आहेत. तेथे MIM च्या प्रस्तावावर प्रतिक्रिया त्यांची जीभ घसरली. MIM ने लग्नाचा प्रस्ताव तिघांना द्यावा, त्यांनी लग्न करावे, हनीमून करावे हा त्यांचा आपापसातला प्रश्न आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची यावर तिखट प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

भाजप नेते नितेश राणे तुळजापूरमध्ये बोलताना म्हणाले, MIM ने तिघांना लग्नाचा प्रस्ताव दिला आहे. आता त्यांनी खुशाल लग्न करावे, हनीमून करावे. त्यांच्या घरात कोण कोणाबरोबर झोपतो, हा प्रश्न आमचा नाही. त्यांचा परस्परांमधला प्रश्न आहे. भाजप म्हणून आम्ही सरळ स्पष्ट आहोत. 2024 च्या निवडणुकीत भाजप स्वतःच्या ताकदीवर सत्ता आणतंय एवढं सरळ स्पष्ट आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.

‘बाळासाहेबांवंतर देवेंद्र फडणवीस हिंदुहऋदय सम्राट’

MIM ने महाविकास आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर शिवसेनेने भगवा झेंडा सोडून हिरवा झेंडाही हाती घेऊ शकते, अशी टीका भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्वाचं स्वप्न देवेंद्र फडणवीस साकार करतील, असं वक्तव्यही नितेश राणे यांनी केलं. ते म्हणाले, ‘ महाविकास आघाडी नावाचे संकट 29 नोव्हेंबर 2019 पासून महाराष्ट्रावर आलंय ते संकट दूर करण्यासाठी भवानी मातेला साकडं घातलं आहे. संभाजीनगर आणि धाराशिव हे नामकरण करणे उध्दवजींच्या नशिबात नाही ते काम देवेंद्रजी करतील. बाळासाहेबांची सगळी स्वप्न भाजप यापुढे पूर्ण करेल. बाळासाहेबांनंतर महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस हेच हिंदुहृदयसम्राट आहेत., असं वक्तव्य नितेश राणे यांनी करत शिवसेनेला डिवचलं आहे.

‘दाऊद डोळा मारत नाही तोपर्यंत नवाबचा राजीनामा नाही’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली आहे. याविषयी बोलताना नितेश राणे म्हणाले, ‘ नवाब मलिकांचा राजीनामा अद्याप झालेला नाही. कारण दाऊदच्या आशीर्वादाने चालणारे सरकार आहे. जोपर्यंत दाऊद डोळा मारत नाही तोपर्यंत हे सरकार नवाबचा राजीनामा घेत नाही, अशा शब्दात महाविकास आघाडीवर खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे.

इतर बातम्या-

Photo Gallery | फैशन का है ये जलवा, दिलकश लगे ये जलवा, महकश लगे ये जलवा, नशा ही नशा ये जलवा…

Ferry Crash : ‘हे पाहणं खरंच खूप कठीण..’ भल्या मोठ्या जहाजाखाली आली छोटी नौका; अर्धा डझन ठार! पाहा, थरारक Video

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.