मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेबरोबर युती नाही; आशिष शेलारांचं मोठं विधान

राज्यात आघाडी सरकारमधील काही घटक पक्षांनी येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता भाजपनेही स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहेत. (ashish shelar)

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेबरोबर युती नाही; आशिष शेलारांचं मोठं विधान
ashish shelar
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 6:27 PM

सांगली: राज्यात आघाडी सरकारमधील काही घटक पक्षांनी येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता भाजपनेही स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहेत. भाजप नेते, आमदार अॅड. आशिष शेलार यांनीही मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचं सुतोवाच केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेबरोबर युती करणार नाही, असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मनसे-भाजप युती होणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. (No alliance with MNS in BMC polls, says ashish shelar)

अॅड. आशिष शेलार आज सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. यावेळी त्यांना शिवसेना आघाडीत गेल्याने मुंबई महापालिका निवडणूक तुम्ही मनसेला सोबत घेऊन लढणार का? असा सवाल करण्यात आला. त्याला शेलार यांनी नाही असं उत्तर दिलं. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सरकार अंतर्गत वादानेच पडेल

यावेळी शेलार यांनी ठाकरे सरकारच्या भवितव्यावरही भाष्य केलं. हे सरकार अंतर्गत वादानेच पडेल. सरकारमध्येच विसंवाद आहे. त्यामुळे आम्हाला काहीही करायची गरज पडणार नाही, असा दावा त्यांनी केला.

पटोले हवामान बदलाप्रमाणे वाक्य बदलतात

यावेळी त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडलं. नाना पटोले दरवेळी विनोदी वक्तव्य करतात. आधी फोन टॅपिंगबद्दल बोलले. त्यांचा कोर्डवर्ड अमजद खान ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं. भरसभागृहात त्यांनी हे सांगितलं. त्यानंतर मुंबईवरून ते लोणावळ्यात आले आणि हवामान बदलल्याप्रमाणे त्यांचं वक्तव्य बदललं. तिकडे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. आता विदर्भात गेले आहेत वाटतं. पुन्हा हवामान बदललं तर पुन्हा केंद्र सरकारकडे बोट दाखवतील. जो माणूस स्वत: च्या विधानावर टिकू शकत नाही. त्याची केस काय टिकणार?, असा सवाल शेलार यांनी केला. सरकारने पटोलेंच्या आरोपांची खुशाल चौकशी करावी. पटोलेंना हे सर्व सांगायला दोन वर्षे का लागली याचीही चौकशी करावी, त्यांनी हा विषय का दाबला त्याचीही चौकशी करावी, त्यांनी कल्पोलकल्पित आरोप केले का? त्याचीही चौकशी करावी, अशी मागणीच त्यांनी केली.

जालन्याला लसी कुणी पळवल्या?

महाराष्ट्रापेक्षा गुजरात आणि उत्तर प्रदेशाला सर्वाधिक लसी देण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. महाराष्ट्र आणि सांगलीच्या वाट्याच्या लसी जालन्याला कुणी पळवल्या हे राष्ट्रवादीने आधी सांगावं. जालन्याचे कमिश्नर आणि आरोग्य मंत्री राजेश टोपेंना केंद्रीय आरोग्य सचिवांनी नोटीसा पाठवल्या. त्या का पाठवल्या ते सांगितलं पाहिजे. मिस मॅनेजमेंट महाराष्ट्रातच आहे. पुरेशा लसी केंद्राकडून दिल्या जात आहेत. राज्याने वाया गेलेल्या लसींचे प्रमाण किती हे आधी सांगावं? मुंबईत इंडिया बुल्सच्या लोकांना ज्येष्ठ नागरिकांच्या आधी लसी कशा मिळाल्या? त्या कुणाच्या सांगण्यावरून दिल्या? ठाण्यातील महापौरांना आधीच लस कशी मिळाली? असे सवाल करतानाच मला उणीदुणी काढायची नाही. फक्त मी महाराष्ट्रातील मिस मॅनेजमेंट दाखवत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातील कोरोनाबळींची टक्केवारी 55.19 टक्के

महाविकास आघाडी सरकाराने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी केलं आहे. तसं चित्रं आहे. देशाच्या 20 टक्के सर्व साधारण रुग्ण महाराष्ट्रात आहेत. देशभरातील सक्रिय रुग्णांपैकी 23 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मृत्यूचा दर महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत 30 टक्क्याहून अधिक आहे. कोरोनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगत महाराष्ट्र कोरोनाच्या रुग्णांना सुविधा देण्यात कमी पडताना दिसला. या संकटात सरकारचा सकारात्मक प्रयत्न दिसला नाही. पहिल्या टप्प्यात पॅरामेडिकल स्टाफ, डॉक्टर, नर्सेस यांचे प्रश्न पाहिले, दुसऱ्या टप्प्यात ऑक्सिजन पासूनचे प्रश्न पाहिले, असं त्यांनी सांगितलं. 30 जूनपर्यंतचे आकडे पाहिले तर देशातील 1 लाख 19 हजार 945 मृत्यूंपैकी 67 हजार 296 मृत्यू एकट्या महाराष्ट्रात आहे. म्हणजे महाराष्ट्रातील कोरोनाबळीची टक्केवारी 55.19 टक्के आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सरकारची वृत्ती रक्तपिपासून भ्रष्टाचारी सरकार सारखी

शहरानंतर कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात किती वाढला हे सांगलीकरांना सांगायला नको. लस येते तेव्हा लसीकरणानंतर महाराष्ट्र देशात नंबर वन होतो. त्याचं श्रेय ठाकरे सरकारचं असतं. लस उशिरा आली आणि कोरोना केंद्र बंद झालं तर दोष मोदी सरकारचा असतो. अशी दुटप्पी भूमिका आघाडी सरकार घेत आहे, अशी टीका करतानाच मोदी सरकारच देशाला लस देत आहे. केवळ राजकारण करण्यापासून सरकारने बाहेर पडावं आणि काम करावं. ठाकरे सरकारची वृत्ती रक्तपिपासून भ्रष्टाचारी सरकार सारखी आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

सरकारचा कुटील डाव

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शेलार यांनी आज पुन्हा आघाडी सरकारवर टीका केली. या सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. फडणवीस सरकारने आरक्षण दिलं. कायद्यात रुपांतर केलं. प्रत्यक्ष फायदा झाला. मुंबई न्यायालयात सर्व युक्तिवाद झाल्यावरही आरक्षण टिकलं. तरीही हे आरक्षण गेलं कसं?, असा सवाल करतानाच हे आरक्षण रद्द होण्यामागे महाविकास आघाडी सरकारचा कुटील डाव कालही होता, आजही आहे. सरकारने कोर्टात योग्य रणनीतीच्या आधारे बाजू मांडली नाही हा आमचा आरोप आहे. बाजू मांडताना सर्व कागदपत्रे कोर्टाला दिली नाहीत. जोडपत्राचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलंच नाही. त्यामुळे ती सर्वोच्च न्यायालयात मांडली नाही. म्हणून कोर्टाला वाटलं हा अहवाल एकतर्फी आहे. त्यामुळे कोर्टाने अहवाल फेटाळला. मुकुल रोहतगी यांनीही महाराष्ट्र सरकार योग्य माहीत देत नसल्याने बाजू मांडता येत नसल्याचं कोर्टात म्हटलं. याचा अर्थ आरक्षण न देणे हा सरकारचा कुटील डाव होता, असा दावा त्यांनी केला.

व्होटबँक भाजपकडे जाऊ नये म्हणून…

मराठा आरक्षणासाठी या सरकारने आता भोसले समिती नेमली. या समितीने अहवाल दिला. त्यांनी मागासवर्ग आयोगाला इम्पिरिकल, सांख्यकी डाटा तयार करण्याचे काम द्या, अशी सूचना केली. पण ठाकरे सरकार काम करत नाही. फक्त केंद्राकडे बोट दाखवत आहे. त्यांना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाही. पण हा खेळखंडोबा जास्त काळ चालणार नाही, असं ते म्हणाले. जे आम्ही करू शकलो नाही, ते भाजपने केलं हीच सरकारची पोटदुखी आहे. म्हणून सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसावे. व्होट बँक भाजपकडे सरकू नये म्हणूनच भाजपने केलेला कायदा मंजूर केला जात नसावा. या स्वार्थापोटी आघाडी सरकार हे सर्व करत असल्याची आमची शंका आहे, असंही त्यांनी सांगितलं. (No alliance with MNS in BMC polls, says ashish shelar)

संबंधित बातम्या:

नानांची भूमिका मविआला सुरुंग लावणारी, अजित पवार संतापले, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

माझ्या वक्तव्याचा विपर्यास, मनगढत कहाण्या रचून सरकारमध्ये फूट पाडण्याचा डाव; पटोलेंचा भाजपवर वार

12 आमदारांच्या नियुक्ती बाबत उच्च न्यायालयात याचिका; राज्यपालांचे निर्णय कायद्याच्या कक्षेत आणण्याची मागणी

(No alliance with MNS in BMC polls, says ashish shelar)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.