नितेश राणेंना जेल की बेल?, उद्या सुनावणी; वाचा कोर्टात नेमकं काय घडलं?
संतोष परब हल्लाप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना दिलासा मिळू शकला नाही. तब्बल साडेतीन तासाच्या सुनावणीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने उद्यावर सुनावणी ढकलली आहे.
सिंधुदुर्ग: संतोष परब हल्लाप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना दिलासा मिळू शकला नाही. तब्बल साडेतीन तासाच्या सुनावणीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने उद्यावर सुनावणी ढकलली आहे. कोर्टाची वेळ संपल्यामुळे ही सुनावणी उद्यावर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जेल की बेल याचा उद्या फैसला होणार आहे.
संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर अटकेची टांगती तलवार असल्याने नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या समोर ही सुनावणी झाली. नितेश राणे यांच्यावतीने अॅड. संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला. तर, सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी आणि गजानन तोडकरी यांनी बाजू मांडली. तब्बल साडेतीन तास कोर्टाने युक्तिवाद ऐकून घेतला. यावेळी कोर्टाची कामकाजाची वेळ संपल्याने राणेंच्या वकिलाने कोर्टाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली. काही वेळ राणेंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने उद्यावर सुनावणी ढकलली आहे.
समोरासमोर बसवून काय साध्य करायचं आहे?
फिर्यादी संतोष परब यांनी वकील पत्रावर सही केली नव्हती. नंतर सरकारी वकिलांनी परब यांची सही घेतली. त्यानंतर कोर्टात युक्तिवाद सुरू झाला. 23 डिसेंबर पोलिसांनी 120 ब हे कलम नंतर लावलं. तसेच न्यायालयासमोर 164 खाली फिर्यादीचा जबाब नोंदवला आहे, असं संग्राम देसाई यांनी कोर्टाला सांगितलं. नितेश राणे आणि सचिन सातपुते यांचं संभाषण पोलिसांनी हस्तगत केल आहे. सीडीआर प्राप्त झाला आहे, मग अजून काय हस्तगत करायचं आहे असा युक्तिवाद नितेश राणेंचे वकील संग्राम देसाईनी केला. सगळं सापडलेलं असताना आता आरोपींना समोरासमोर बसवून पोलिसांना काय साध्य करायच आहे? असा सवालही देसाई यांनी केला.
मीडियाला सांगण्याची गरज काय?
संशयिताना घटना घडल्या नंतर अटक केली. मग ते कुठे राहतात? त्यांचा पत्ता किंवा संशयीतांची नावे अद्याप पोलिसांनी अद्याप उघड केली नाहीत. हे पहिल्यांदाचं घडतंय. संशयितांची नावे एवढे दिवस गुप्त ठेवता मग नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना नोटीस बजावली हे तपास अधिकाऱ्याला मीडीयाला सांगण्याची गरज काय होती? असा सवाल देसाई यांनी केला.
अंतरीम जामीन अर्ज फेटाळला
अटकपूर्व जामी अर्ज झाल्यानंतर पहिला युक्तिवाद अर्जदाराच्या वकिलाने करायचा आहे. त्यांचा युक्तिवाद आम्ही ऐकला. त्यांना काय म्हणायचे आहे ते आम्ही जाणून घेतलं. त्यांनी जे जे मुद्दे मांडले त्याला उत्तर देणं आमचंस कर्तव्य आहे. आम्ही युक्तिवाद सुरू केला. पण युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही. उद्या ऊर्वरीत युक्तिवाद करू., असं सरकारी वकिलांनी सांगितलं. तसेच अंतरीम जामिनाची मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे, असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं.
कागदपत्राच्या आधारेच बोलू
पहिला मुद्दा म्हणजे गुन्ह्याची न्यायालयात सुनावणी आहे. गुन्ह्यात आरोपी आहे की नाही यावर वकिलाने बोललं पाहिजे. पण त्यांनी विधानसभेत काय झालं? कोणी कुणाचा सत्कार केला हे सांगितलं. गुन्हे घडतात त्याचा तपास करणं हे पत्रकाराचं काम आहे हे आम्ही सांगितलं. न्यायालयासमोर पोलिसांसमोर ठेवून त्यावर युक्तिवाद करू. आम्हाला बाकीच्या गोष्टींशी घेणंदेणं नाही. गुन्ह्याशी संबंधित गोष्टीवर आमचा भर राहणार आहे. आम्ही कागदपत्रांच्या आधारे बोलणार आहोत, असंही घरत यांनी सांगितलं.
मुख्य सूत्रधार नितेश राणे
संतोष परब यांच्यावतीने अॅड. विकास पाटील शिरगावकर यांनी बाजू मांडली. फिर्याद कशी खरी आहे. कुणाला अडकवायचं असतं तर मी कधीच केस घेतली नसती. त्याच्यावर झालेला हल्ला जीवघेणी होता. ती अपघाताची घटना असती तर गाडी थांबते. पण या ठिकाणी तसं नव्हतं. इथं वार केला. तो छातीवर होता. यातील मुख्य सूत्रधार हा नितेश राणेच असल्याचं आम्ही कोर्टासमोर मांडलं, असं अॅड. विकास पाटील शिरगावकर यांनी सांगितलं.
Video : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 28 December 2021 https://t.co/Duu5fM44bm @OfficeofUT @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra #Headlines #Tv9Marathi #SuperfastNews #MahafastNews #fastnews #DistrictNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2021
संबंधित बातम्या:
महाविकास आघाडीचे किती आमदार नाराज?; बावनकुळेंनी आकडाच सांगितला