जळगावकरांना मोठा दिलासा; गेल्या सव्वा महिन्यात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

| Updated on: Aug 28, 2021 | 9:39 AM

Coronavirus | गेल्या सव्वा महिन्यात संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. एवढेच नव्हे तर नव्या कोरोना रुग्णांचा दैनंदिन आकडाही दहाच्या खाली आला आहे. जळगावातील नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे.

जळगावकरांना मोठा दिलासा; गेल्या सव्वा महिन्यात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही
कोरोना
Follow us on

जळगाव: राज्याच्या विविध भागांमधील कोरोनाची लाट आता बऱ्याच प्रमाणात ओसरल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्याला एक मोठा दिलासा मिळाला आहे. कारण येथील परिस्थितीमध्ये लक्षणीय सुधारणा पाहायला मिळत आहे. गेल्या सव्वा महिन्यात संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. एवढेच नव्हे तर नव्या कोरोना रुग्णांचा दैनंदिन आकडाही दहाच्या खाली आला आहे. जळगावातील नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये भंडारा, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील परिस्थितीही वेगाने सुधारत आहे. राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अद्यापही चिंतेचे वातावरण आहे. पुण्यात गुरुवारी 399 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांचा (Corona Patient) दर हा 6.88 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

देशात विक्रमी लसीकरण

देशात शुक्रवारी विक्रमी लसीकरणाची नोंद झाली. काल एकाच दिवसात एक कोटी नागरिकांना लस देण्यात आली. या कामगिरीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करुन आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले. आतापर्यंत देशातील 62 कोटी लोकांचे लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

ग्रामीण भागात दैनंदिन रुग्णसंख्येत घट

एकीकडे पुणे शहरात कोरोनाबाधितांचा दर वाढला असला तरी ग्रामीण भागात मात्र, दैनंदिन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. गेले आठ दिवस पुणे ग्रामीणमध्ये बाधित दर हा दोन ते चार टक्क्यांच्या आथ राहिला आहे. ग्रामीण भागात सरासरी पाचशेच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. मध्यंतरी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आली होती. पण ग्रामीण भागात बाधितांची संख्या कमी होत नव्हती. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली होती. पण गेल्या आठवड्यात आणि या आठवड्याच्या चार दिवसांत ही रुग्णसंख्या चारशे ते पाचशे दरम्यान राहिली आहे.

95 गावं अजूनही हॉटस्पॉट

पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तर हॉटस्पॉट गावांची संख्या अजूनही 95 आहे. त्यामध्ये सर्वाधिक 26 गावं ही शिरूर तालुक्यातली आहेत. या हॉटस्पॉट गावांमध्ये दहापेक्षा जास्त कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. वेल्हा आणि भोर तालुक्यातल्या हॉटस्पॉट गावांची संख्या शून्यवर आली आहे. काही औद्योगिक वसाहती असलेल्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचं आव्हान आरोग्य विभागापुढे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने हॉटस्पॉट गावांसह सर्वच ठिकाणी धडक चाचण्यांची मोहीम हाती घेतली होती. या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

इतर बातम्या :

Maharashtra News LIVE Update | महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी, राज्यात एका दिवसात 5,031 कोरोनाबाधित, 216 जणांचा मृत्यू

एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नसतं, आम्ही नरेंद्र मोदी, अमित शाहांशी बोलू: संजय राऊत

करारा जवाब मिलेगा पर तारीख नही बताऐंगे, नितेश राणेंचा शिवसेनेला धमकीवजा इशारा