मुंबईची लोकल कधी सुरू होणार?; वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुंबईतील लोकल तूर्तास सुरू होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई लोकल इतक्यात सुरू करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. (cm uddhav thackeray)

मुंबईची लोकल कधी सुरू होणार?; वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?
cm uddhav thackeray
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 3:07 PM

सांगली: मुंबईतील लोकल तूर्तास सुरू होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई लोकल इतक्यात सुरू करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. उलट मुख्यमंत्र्यांनी सर्व कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरूच ठेवण्याचा सल्ला दिला आहे. (No green signal for Mumbai local trains from cm uddhav thackeray)

पूरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकल सुरू करणार नसल्याचं स्पष्ट केलं. मुंबई लोकलबाबत आपण लगेच निर्णय घेणार नाही. कारण कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. त्यासाठी केंद्रानेही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. पहिल्या टप्प्यात लोकल सुरू करणं शक्य नाही. काही गोष्टी शिथील करत आहोत. त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम पाहूनच निर्णय घेणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

वर्क फ्रॉम होम सुरू ठेवा

यावेळी त्यांनी कार्यालयांना पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची कळकळीची विनंती केली. सर्व ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांनी कामाच्या वेळा विभागून घ्या. हवं तर 24 तास कार्यालये सुरू ठेवा. माझी हरकत नाही. पण कार्यालयात गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्या. वर्क फ्रॉम होम करणं शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम करायला सांगा. उद्योगांनी शक्य आहे तिथे बायो बबल करणे व आरोग्याचे नियम पाळून सुरक्षितरित्या उत्पादन कसे करता येईल याचा विचार करावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

तर दुप्पट ऑक्सिजन लागेल

तिसरी लाट येणार आहे. केंद्राने सूचना दिल्या बंधनं नीट पाळा. ते पाळण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. दुसऱ्या लाटेत जेवढा ऑक्सिजन लागला त्याच्या दुप्पटीने तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन लागण्याची शक्यता आहे. दुर्देवाने इतर राज्यात लाट आली तर ऑक्सिजन मिळणार नाही, त्यामुळे आपण कोणताही निर्णय घाईत घेण्यात येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दुकाने 8 वाजेपर्यंत सुरू राहणार

राज्यातील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. तिथेच ही परवानगी असेल. कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. या संदर्भातील जीआर आज संध्याकाळी निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्या सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंतच दुकाने सुरू आहेत. दुपारी 4 पर्यंत बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने दुकानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी व्यापारी आणि दुकानदारांकडून होत होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले असता त्यांनी ही माहिती दिली. (No green signal for Mumbai local trains from cm uddhav thackeray)

संबंधित बातम्या:

सांगली-कोल्हापुरात मुख्यमंत्री म्हणाले, कठोर निर्णय घ्यावेच लागतील, उद्धव ठाकरे नेमका कोणता निर्णय घेणार?

दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढवणार, पण फायदा कुणाला?; वाचा सविस्तर

चिपळूणकरांच्या खात्यात अजूनही 10 हजार रुपये जमा नाही, सामंत म्हणतात, मंगळवारी 5 हजार रुपये जमा होणार

(No green signal for Mumbai local trains from cm uddhav thackeray)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.