Akola | पैसे नाही तर मृतदेहाची पॅकिंग नाही, अकोल्यातील शवविच्छेदन गृहातील प्रकाराने नातेवाईक संतप्त
अकोला येथील शवविच्छेदन गृहात मृतदेहाच्या पॅकिंगसाठी पैशांची मागणी करण्यात आली. त्यामुळं संतप्त नातेवाईकांनी मृतदेह डीन कार्यालयात आणला. यामुळं कार्यालयात तणाव निर्माण झाला होता.
अकोला : अकोल्यात शवविच्छेदन गृहात मृतदेहाची अहवेलना केल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केलाय. शवविच्छेदन (Autopsy) गृहातील कर्मचाऱ्यांनी पैसेही मगितल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. यावर संतप्त झालेल्या मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह डीन कार्यलयात आणला. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव (Khamgaon) येथील 35 ते 40 वर्षीय अविनाश काळे (Avinash Kale) या युवकाने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह अकोला येथील शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. त्या ठिकाणी शवविच्छेदनामधील कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप यावेळी नातेवाईकांनी केला. दर वेळी शवविच्छेदनानंतर मृतदेह हा पॉलिथिनमध्ये पॅक करून दिला जातो. पण यावेळी पैसे न दिल्याने मृतदेह हा चादरमध्ये बांधून दिला. त्यामुळं संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह हा डीन कार्यालयात आणला. पैसे नाही तर मृतदेहाची पॅकिंग नाही, असा हा प्रकार काला दुपारी घडला.
काय आहे प्रकरण
अविनाश काळे या युवकाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करावयाचे होते. शवविच्छेदन झाल्यानंतर पॉलिथीनमध्ये मृतदेह गुंडाळून दिला जातो. पण, यासाठी कर्मचारी पैशांची मागणी करतात. अविनाशचे नातेवाईक दुःखात होते. अशावेळी पैसे मागितल्यानं ते संतापले. आधीच कर्ता युवक गेल्यानं ते दुःखी होते. त्यामुळं त्यांना अविनाशचा मृतदेह हा डीन कार्यालयात नेला.
डीन कार्यालयात तणाव
डीन कार्यालयात मृतदेह नेण्यात आला. त्यामुळं सर्व कर्मचारी अवाक झाले. शवविच्छेदनगृहात होत असलेल्या गैरव्यवहाराला वाचा फोडण्यात आल्यानं काही जण खूश होते. पण, डीन कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वादावर पडता पाडत प्रकरण शांत करण्यात आले. अकोला येथील शवविच्छेदन गृहात मृतदेहाच्या पॅकिंगसाठी पैशांची मागणी करण्यात आली. त्यामुळं संतप्त नातेवाईकांनी मृतदेह डीन कार्यालयात आणला. यामुळं कार्यालयात तणाव निर्माण झाला होता.