Bhavna Gawli : भांडल्याशिवाय काही मिळत नाही, भावना गवळी यांचे वाशिममध्ये शक्तिप्रदर्शन, पुन्हा भगवा फडकवण्याचा निर्धार

माझी संपत्ती बघा किती आहे. 5 वेळा मला निवडून दिले. माझ्या नशिबाला तुमची साथ आहे. तुमच्यासाठी जेवढा झटता येईल, ते 100 टक्के काम करणार आहे.

Bhavna Gawli : भांडल्याशिवाय काही मिळत नाही, भावना गवळी यांचे वाशिममध्ये शक्तिप्रदर्शन, पुन्हा भगवा फडकवण्याचा निर्धार
भावना गवळी यांचे वाशिममध्ये शक्तिप्रदर्शनImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 5:41 PM

वाशिम : शिंदे गटात प्रदर्शन केल्यानंतर खासदार भावना गवळी यांनी आज वाशिममध्ये शक्तिप्रदर्शन (Power Show) केलं. शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं. भावना गवळी कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाल्या, अतिवृष्टी (Heavy Rain) झाली या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी. पीक विमा कंपनीने योग्य दर पैसे दिले नाही तर तुमच्यासोबत रस्त्यावर उतरेनं. मला सगळे बोलतात ताई भांडत राहते. भांडल्याशिवाय काही मिळत नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. त्या म्हणाल्या, मी त्याच दिवशी सांगितलं, टायगर अभी जिंदा है. लढाई लढताना माझे वडील यांनी शिवसेनेचे व्रत घेतले. शाखा उभ्या केल्या. माझ्या वडिलांनी माझ्यावर तेच संस्कार केले. मी विद्यार्थी सेनेत (Student Army) गेले. त्यावेळी राज ठाकरे आमचं नेतृत्व करत होते. या जिल्ह्याचे शिल्पकार माझ्या वडिलांना म्हटलं जातं. तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं. मी धन्य आहे. माझ्या वरच्या विश्वास संकटामध्ये मला मदत मिळाली. आशीर्वाद मिळाला. शेवटच्या माणसाला न्याय देण्याचा काम केलं आहे.

पुन्हा मतदारसंघात भगवा फडकवेन

आम्ही गद्दार आहोत असं जे लोक बोलतात. आम्हाला गद्दार म्हणतात त्यांना सांगतो. आमच्या बापाने शिवसेना उभी केली. 12 खासदार, 50 आमदार बाहेर पडले. चिंतन करण्याची गरज आहे. पुन्हा तुमच्या साक्षीने सांगतो. भगवा या मतदारसंघात फडकवेल. नेता कसा असावा तर सर्व सामान्याचे अश्रू पुसणार असावा. ते काम एकनाथ शिंदे करत आहेत. देवेंद्र फडणवीस विकासकाम करत आहेत. मोठं मोठी कामं त्यांनी केलीत. हे दोघे विकासकाम करत आहेत, असंही भावना गवळी यांनी ठणकावून सांगितलं.

माझी संपत्ती किती आहे बघा

भावना गवळी म्हणाल्या, या जिल्ह्यात रेल्वे पुरना खंडवा लाईन मोठी केली. अनेक विकास काम केली. वाशिमच्या धरणाची उंची वाढवावी. विद्यापीठाचे उपकेंद्र हवे. बालाजीची नगरी वाशिम आहे. ही विदर्भातील पहिली सभा आहे. माझ्या सगळ्या लोकांची भक्कम साथ माझ्यासोबत आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये लोकं मोठ्या संख्येने आले आहेत. मी लपंडाव करणारी नाही. सरळ सरळ काम करणारी आहे. त्या म्हणाल्या, माझी संपत्ती बघा किती आहे. 5 वेळा मला निवडून दिले. माझ्या नशिबाला तुमची साथ आहे. तुमच्यासाठी जेवढा झटता येईल, ते 100 टक्के काम करणार आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.