Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाखो टन खनिज विकले, उत्खनन कंपनीने शासनासोबत केलेल्या कराराचा भंग?, जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

खाण सुरू झाल्यापासून आतापर्यंत ५७ लाख टन खनिज परराज्यात विकण्यात आले. दुसरीकडे या भागात जैवविविधता आणि जंगल वाचवण्यासाठी कोणतेही उपाय केलेले नाही.

लाखो टन खनिज विकले, उत्खनन कंपनीने शासनासोबत केलेल्या कराराचा भंग?, जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 2:36 PM

व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : २००७ साली लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीला सुरजागड लोहखाणीचे कंत्राट मिळाले. ३४८ हेक्टर वनजमीन कंपनीला उत्खननासाठी भाडे तत्वावर देण्यात आली. यावेळी कंपनी आणि केंद्रशासन यांच्यात झालेल्या करारानुसार या खाणीतील लोहखनिजाची इतरत्र विक्री करता येणार नाही. खाण परिसरात किंवा जिल्ह्यातच कारखाना उभारून प्रक्रिया करण्यात यावी, अशी अट ठेवण्यात आली होती. या करारात बदल करून राज्य शासनाने प्रक्रियेनंतर शिल्लक खनिज विदर्भात विक्री करता येईल, अशी परवानगी दिली होती. मात्र, कंपनीने इतक्या वर्षांत कारखाना उभारला नाही. तसेच कराराचे पालन केलेले नाही. खाण सुरू झाल्यापासून आतापर्यंत ५७ लाख टन खनिज परराज्यात विकण्यात आले. दुसरीकडे या भागात जैवविविधता आणि जंगल वाचवण्यासाठी कोणतेही उपाय केलेले नाही.

ग्रामसभांना डावलून खाणीसंदर्भात निर्णय

एटापल्ली हा तालुका अनुसूचित क्षेत्र (पेसा) अंतर्गत येतो. तरीही ग्रामसभांना डावलून खाणी संदर्भातील निर्णय घेण्यात आले आहेत. येथील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले दिसत नाही. हा सर्व प्रकार सुरू असताना प्रशासनाची याला मूकसंमती होती, असेच दिसून येते. असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी

एका स्वतंत्र समितीमार्फत सुरजागड लोह प्रकल्पाची चौकशी करून दोषींना योग्य शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र शासनाच्या पर्यावरण आणि वने मंत्रालयसह विविध विभागांना नोटीस बजावून महिनाभरात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली.

शासनाच्या कराराचा भंग

गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील खाणीची स्वतंत्र समिती मार्फत शासनाच्या कराराचा भंग केला. त्यामुळे चौकशी करण्यात यावी, अशी जनहित याचिका चंद्रपूरच्या प्रकृती फाउंडेशनने मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपुरात दाखल केली. याप्रकरणी केंद्र शासनाला नोटीस जारी केले आहे.

स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करावी

सुरजागड खाणीचे कंत्राट मिळविणाऱ्या लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने शासनासोबत केलेल्या कराराचा भंग केला आहे. त्यामुळे खाणीत सुरू असलेले उत्खनन पूर्णपणे अवैध आहे. याची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्यात यावी. अशी मागणी करणारी जनहित याचिका प्रकृती फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक दीक्षित यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे.

या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने केंद्र शासन, गडचिरोली जिल्हाधिकारी यांच्यासह अकरा प्रतिवाद्यांना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?.
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव.
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका.
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'.
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....