गोंदिया: उद्या सुप्रीम कोर्टातून येणारा निकाल ओबीसींच्या बाजूनेच असेल असा विश्वास राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. त्यामुळे ओबीसी आरक्षणावरील निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला. ते गोंदियात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारासाठी आल्यावर बोलत होते. उद्या सुप्रीम कोर्टातुन येणारा निकाल हा ओबीसींच्या बाजूने लागणार असल्याच्या विश्वास वड्डेट्टीवार यांनी व्यक्त केला. तसेच सरकार व आयोगात कोणतेही मतभेद नाही. सर्व काम सुरळीत सुरु असल्याचेही त्यांनी सांगितलं.
इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी 5 महिने लागणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. इम्पिरिकल डेटा बाबत चक्क केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्रं सादर करून वेळ मागितला आहे. आपल्या शेजारील मध्यप्रदेश राज्यावर हेच संकट आले असता केंद्र सरकारने बरोबर लायनीवर येत त्वरित प्रतिज्ञापत्रं देत सुप्रीम कोर्टाला वेळ मागितला, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
मागास आयोग ही स्वायत्त संस्था असून आम्ही त्यांच्या खात्यात 5 कोटी रुपये टाकले आहेत. त्यांनी त्याचा वापर कसा करावा हे त्यांनी स्वत: ठरवावे असा सल्ला ही त्यांनी दिला आहे.
यावेळी त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. पडळकर नया नया पंछी है. नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है, अशा खोचक शब्दात त्यांनी पडळकर यांच्यावर पलटवार केला. गोपीचन्द्र पडळकर यांना ज्ञान नसल्याची टीकाही त्यांनी केली. ज्या माणसावर लूटमारी, फसवणूक, शेती हडप करणे, अॅट्रोसिटी सारखे गुन्हे लागले आहेत त्या व्यक्तिच्या विधानावर बोलणे चुकीचे ठरेल असे मतही च्यांनी व्यक्त केले.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 16 January 2022 pic.twitter.com/QfUyTD1Anh
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 16, 2022
संबंधित बातम्या:
दुगाण्या झाडायला काय अक्कल लागते?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी सुरूच
किरण मानेंच्या विरोधात मनसे मैदानात, ‘इतर कलाकारांना त्यांनी त्रास दिला, योग्य वेळेस उत्तर देऊ!’