CCTV Video : नांदेडमध्ये आमिष दाखवून दीड लाखांचे दागिने लंपास, चोरटा cctv त कैद

हिमायतनगर शहरातील शंकर नगर भागात मजुरदार विष्णू राजाराम उत्तरवार हे शहरासह ग्रामीण भागात उन्हातान्हात मुरमुरे विकून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह चालवितात. सकाळी 12 वाजेपर्यंत व्यवसाय करून आल्यानंतर घरी बसले असता कोणीतरी काळ्या रंगाचा पँटशर्ट घातलेला अज्ञात व्यक्ती आला. त्याने लॉटरीमध्ये स्कुटी आणि सोन्याचे बक्षीस लागले असल्याचे आमिष या व्यक्तीला दाखवले.

CCTV Video : नांदेडमध्ये आमिष दाखवून दीड लाखांचे दागिने लंपास, चोरटा cctv त कैद
नांदेडमध्ये आमिष दाखवून दीड लाखांचे दागिने लंपासImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 6:30 PM

नांदेड : नांदेडच्या हिमायतनगर शहरात लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून दीड लाखांचे दागिने (Jewelery) पळवल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. काळा शर्ट पॅन्ट आणि गॉगल लावून आलेला हा चोरटा जाताना रस्त्यावरच्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात देखील कैद झाला आहे. हिमायतनगर शहरातील शंकर नगर भागातील एका नागरिकास आरोपीने तुम्हाला लॉटरीमध्ये स्कुटी आणि सोने लागल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी या नागरिकाला आपल्यासोबत बाईकवरुन नेले. नागरिकाकडून दीड लाखाचे सोन्याचे दागिने घेऊन आरोपी लंपास झाला. या घटनेमुळे शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात भर दिवसा फसवणूक लुटमारीच्या घटना घडत असल्याने हिमायतनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. (One and a half lakh jewelery snatched in Nanded, Theft caught in CCTV)

लॉटरीत स्कुटी आणि सोने लागल्याचे सांगत सोने घेऊन सोबत नेले

हिमायतनगर शहरातील शंकर नगर भागात मजुरदार विष्णू राजाराम उत्तरवार हे शहरासह ग्रामीण भागात उन्हातान्हात मुरमुरे विकून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह चालवितात. सकाळी 12 वाजेपर्यंत व्यवसाय करून आल्यानंतर घरी बसले असता कोणीतरी काळ्या रंगाचा पँटशर्ट घातलेला अज्ञात व्यक्ती आला. त्याने लॉटरीमध्ये स्कुटी आणि सोन्याचे बक्षीस लागले असल्याचे आमिष या व्यक्तीला दाखवले. त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडील सोने द्यावे लागेल असे सांगितले. तसेच तुमच्याकडील सोने द्या, सोनाराकडे वजन करून परत देतो अशी बतावणी केली.

हे सुद्धा वाचा

यावर विश्वास बसत नसल्याने उत्तरवार यांनी मी माझ्या मुलास विचारून तुमच्याकडे सोने व मोबाईल देतो असे म्हटले. त्यानंतर अज्ञात इसमाने तुम्ही चला मुलाला विचारू म्हणून सोबत सोने व मोबाईल घेण्यास सांगितले. आणि त्या अज्ञात व्यक्तीने त्याच्या स्प्लेंडर या दुचाकीवरून शहरातील रस्त्याने नेत असतानाच राज लाईट्स या दुकानाच्या बाजूला गाडी थांबवून गाडीवरून उतरविले. त्यांच्याजवळ खिशात असलेला सोने-मोबाईल घेऊन सोनाराकडे जाऊन याची पावती आणतो म्हणून दिशाभूल करून 16.5 ग्रॅम वजन असलेले 89 हजाराची गंठण आणि 10 ग्रॅम वजन असलेले 54 हजार किमतीचा दागिना व 13 हजार 999 रुपयाचा मोबाईल असा एकूण 1 लाख 56 हजार 999 रुपयाचा ऐवज घेऊन पोबारा केला.

आरोपीविरोधात 420 चा गु्न्हा दाखल

याबाबतची फिर्याद विष्णू राजाराम उत्तरवार यांनी दिल्यावरून हिमायतनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर 420 म्हणजे फसवणूक करून दागिने लंपास केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली बिट जमादार बालाजी सिंगणवाड हे करीत आहेत. दरम्यान आरोपी ज्या दिशेने दुचाकीवरून पळाला त्या भागाचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून, पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. दिवसा ढवळ्या नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक करून एक प्रकारे सोन्याचे दागिने लंपास केले. यासाठी कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. (One and a half lakh jewelery snatched in Nanded, Theft caught in CCTV)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.