मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश कायम
2 ऑगस्ट रोजी देवानंद रोचकरी यांनी केलेल्या अपील व स्थगिती आदेशावर 9 ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घेण्यात आली यात वस्तुस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकारी यांचे आदेश कायम ठेवण्यात आले आहेत.
उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश कायम ठेवण्यात आले आहेत. चौकशी समितीनंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिलेले आदेश कायम ठेवले असून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेंनी प्रकरणाची सत्य स्थिती व प्रशासनाची बाजू ऐकल्यावर ही स्थगिती तात्काळ उठवली आहे. मंत्र्यांनी स्थगिती उठविली व पुढील कार्यवाहीबाबतचे आदेश नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी उ ना सार्दळ यांनी काढले आहेत. (Order to register criminal cases in Mankavati Tirthkund case upheld)
2 ऑगस्ट रोजी देवानंद रोचकरी यांनी केलेल्या अपील व स्थगिती आदेशावर 9 ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घेण्यात आली यात वस्तुस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकारी यांचे आदेश कायम ठेवण्यात आले आहेत. या आदेशामुळे आता देवानंद रोचकरीसह इतरांवर गुन्हा नोंद होण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यादृष्टीने गतीमान प्रशासकीय कारवाईची गरज व मागणी होत आहे. मागील वेळी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यावरही 3 दिवस कारवाई झाली त्या दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती मिळविण्यात रोचकरी यांना यश आले होते.
जिल्हाधिकारी यांचे होते हे 4 आदेश
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 4 वेगवेगळ्या मुद्यावर कारवाईचे आदेश जारी केले होते. जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक यांनी मूळ आखीव पत्रिकेवर महाराष्ट्र शासन यांचे नगर परिषद निगराणीखाली नोंद नियमित करावी. सदर कुंड प्राचीन असल्याने प्राचीन स्वरूपातील बांधकामात काही बदल झाले असतील तर औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक यांनी पुरातत्व संवर्धन कायदा 1904 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी. बनावट कागदपत्रे प्रकरणी नगर परिषद मुख्याधिकारी यांनी संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी व तुळजापूर तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सदर जागी अतिक्रमण होणार नाही यांची दक्षता घ्यावी असे चार मुद्दे आदेशित केले होते. त्यातील केवळ तिसऱ्या म्हणजे रोचकरी यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करण्यास नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती मात्र ती आता रद्द करण्यात आल्याने देवानंद रोचकरी व इतरांवर गुन्हे नोंद करण्याचा प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल केल्या होत्या पोस्ट
नगर विकास मंत्र्यांनी स्थगिती दिल्यावर देवानंद रोचकरी समर्थकांनी ‘देवराज सरकार’ सह ‘हिंसा परमोधर्म’,’बाप म्हणतात तुळजापूरचा’, ‘तुळजापूर तालुक्याचा 7/12 तुमच्या आईबापाच्या नावावर आहे का? मग कोणाच्या आईबापाच्या नावावर आहे, ते सांगा. मग 7/12 रिकामा करुन घेतो’ आम्ही, अशा आशयाचे फिल्मी डायलॉग असलेले देवानंद रोचकरी यांचे फोटोसह व्हिडीओ त्यांच्या समर्थकांनी स्थगिती आदेश मिळाल्यानंतर सोशल मिडीयावर व्हायरल केले होते, त्यामुळे दहशत माजली होती. तसेच याबाबत देविभक्तांत नाराजीचा सूर होता.
काय आहे मंकावती कुंड प्रकरण ?
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण , तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे. गरीबनाथ दशावतार मठाचे महंत सावजी महाराज, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष तथा मनसेचे जिल्हा संघटक अमर राजे कदम, राष्ट्रवादी पक्षाच्या कायदे विभागाचे तुळजापूर कार्याध्यक्ष ऍड जनक धनंजयराव कदम पाटील व इतरांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांना 31 मे 21 रोजी लेखी तक्रार करून तुळजापूर शहरातील प्राचीन श्री विष्णू तीर्थ (सध्या मंकावती कुंड नावाने प्रचलित) बेकायदेशीर काम करणाऱ्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे, नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे व भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप अधीक्षक वैशाली गवई यांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीची नेमणूक केली होती. या समितीने केलेल्या अहवालांनंतर जिल्हाधिकारी यांनी फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते. (Order to register criminal cases in Mankavati Tirthkund case upheld)
PHOTO | Movie Date : अफेअरच्या बातम्यांदरम्यान कतरिना कैफसोबत ‘शेर शाह’ पाहण्यासाठी पोहचला विक्की कौशल, पाहा फोटोhttps://t.co/IiJNW552MX#KatrinaKaif |#VickyKaushal |#MovieDate
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 10, 2021
इतर बातम्या
127वं संविधान संशोधन विधेयक लोकसभेत मंजूर, 385 खासदारांचं समर्थन; आता जबाबदारी राज्यांवर!