उस्मानाबादमध्ये तब्बल 485 कोरोना मृत्यू आकड्याची तफावत, आरोग्य उपसंचालकांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूत तब्बल 485 आकड्याची तफावत असल्याचे समोर आले आहे. लातूर आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी याप्रकरणी आरोग्य विभागास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. (Osmanabad difference 485 corona deaths)

उस्मानाबादमध्ये तब्बल 485 कोरोना मृत्यू आकड्याची तफावत, आरोग्य उपसंचालकांनी बजावली कारणे दाखवा नोटीस
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये तब्बल 485 आकड्याची तफावत असल्याचे समोर आले आहे.
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 11:11 AM

उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये तब्बल 485 आकड्याची तफावत असल्याचे समोर आले आहे. लातूर आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी याप्रकरणी आरोग्य विभागास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. (Osmanabad difference 485 corona deaths Deputy Director of Health issues show cause notice To heath Department)

आरोग्य उपसंचालकांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

कोरोना पोर्टलवरील उस्मानाबाद जिल्ह्यातील मृत्यूची आकडेवारी व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य विभागाने दिलेल्या दैनंदिन प्रेस नोटमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असून ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे ती तात्काळ दुरुस्त करावी अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशी कारणे दाखवा नोटीस आरोग्य उपसंचालक डॉ माले यांनी जिल्हा साथरोग अधिकारी,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व डेटा मॅनेजर यांना काढली आहे. नोटीस देऊनही 2 दिवस झाले तरी यावर कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही.

485 मृत्यूची तफावत, नेमकं प्रकरण काय?

कोविड पोर्टलनुसार 5 जुलै पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात 1861 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र जिल्ह्याच्या दैनंदिन प्रसिद्धी पत्रकात 1376 मृत्यू दर्शविले आहेत. त्यामुळे 485 मृत्यूची तफावत आहे.या तफावतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले असून याबाबत राज्याचे आरोग्य संचालकांनी वारंवार तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आकडेवारी दुरुस्तीबाबत वारंवार फोन, व्हीसीमध्ये सुचना करुनही अहवालात सुधारणा करण्यात आलेली नाही त्यामुळे नोटीस दिली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोना रिपोर्ट

उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर कोरोनाचे 58 हजार 955 रुग्ण सापडले असून त्यापैकी 56 हजार 997 रुग्ण बरे झाले असल्याने हे प्रमाण 96.67 टक्के आहे. तर प्रेस नोटवरील आकडेवारीनुसार 1380 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्युदर 2.34 टक्के आहे. कोविड पोर्टलनुसार मृत्यू आकडेवारी विचारात घेतली तर 1861 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्युदर हा 3.15 टक्के येतो. म्हणजे मृत्यूच्या आकड्यात 485 तर मृत्युदरमध्ये 0.81 ची तफावत येऊन तो वाढतो.

कोरोना मृत्यूच्या आकडेवारीत सुरुवातीपासुन सावळा गोंधळ

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना मृत्यूच्या आकडेवारीत सुरुवातीपासुन सावळा गोंधळ पाहायला मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली आकडेवारी व नगर परिषदेने केलेले अंत्यसंस्कार याची आकडेवारी कुठेच जुळली नाही. त्यामुळे या मृत्यूंच्या आकड्यांचं गौडबंगाल काय, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.

(Osmanabad difference 485 corona deaths Deputy Director of Health issues show cause notice To heath Department)

हे ही वाचा :

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी उस्मानाबाद सज्ज, 7 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, 3 लिक्विड टँकमधून दररोज 73 टन ऑक्सिजन निर्मिती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.