धक्कादायक| शाळेच्या खिचडीत पालीचे तुकडे, उमरग्यात 40 विद्यार्थ्यांना विषबाधा, डॉक्टरांची टीम दाखल

जवळपास 248 जणांना या खिचडीचे वाटप करण्यात आले होते. मात्र खिचडीची मर्यादा जास्त असल्याने पालीचे विष जास्त पसरले नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

धक्कादायक| शाळेच्या खिचडीत पालीचे तुकडे, उमरग्यात 40 विद्यार्थ्यांना विषबाधा, डॉक्टरांची टीम दाखल
पेठसावंगी येथील शाळेच्या खिचडीत पालीचे तुकडेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 4:31 PM

उस्मानाबाद | उस्मानाबाद  जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत (Khichadi) पालीचे तुकडे आढळून आले. ही खिचडी खाल्ल्यामुळे तब्बल 40 विद्यार्थ्यांना विषबाधा (Poisoning) झाली असून या प्रकारामुळे शाळेत खळबळ माजली. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील पेठसावंगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत (ZP School) आज मंगळवारी सकाळी ही घटना घडली. मुलांनी शाळेतील खिचडी डब्यात भरून घरी नेली होती. तेव्हा एका मुलाच्या डब्यात पालीचे मुंडके तर एकाच्या डब्यात पालीच्या शरीराचा मागील भाग आढळून आला. पालकांनी तत्काळ शाळेत येऊन शिक्षकांना या प्रकाराबाबत माहिती दिली. मात्र तोपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप झाले होते. अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा होऊन त्रास सुरु झाला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून पालक, शिक्षक आणि डॉक्टरांनी एकत्र येऊन उपाययोजना केल्याने मोठं संकट टळल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

40 जणांना विषबाधा

जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ही खिचडी खाल्ल्यामुळे उलटी, मळमळ, डोके दुखणे, चक्कर येणे असा त्रास सुरप झाला. काही पालकांनी शाळेत धाव घेत या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना नांगरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आळे. 18 विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेतून उमरगा येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. तर काहींना सौम्य त्रास होत असल्याने नाईचाकुर येथील डॉक्टरांची टीम बोलावून शाळेतील एका रुमममध्ये विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. जवळपास 248 जणांना या खिचडीचे वाटप करण्यात आले होते. मात्र खिचडीची मर्यादा जास्त असल्याने पालीचे विष जास्त पसरले नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

शिवसेना आमदारांची भेट

दरम्यान, शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाला भेट दिली. विद्यार्थ्यांची चौकशी करून डॉक्टर आणि शाळा प्रशासनाला योग्य ती देखभाल करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विद्यार्थी तसेच पालकांची विचारपूस केली. अशा प्रकारची घटना भविष्यात घडू नये, यासाठी शाळा प्रशासनाने पावले उचलली असल्याचे शिक्षकांनी सांगितलं. तसेच इतर शाळांमध्येही अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून पत्र पाठवण्यात आल्याचे शिक्षकांच्या वतीने सांगण्यात आले.

इतर बातम्या-

Metro 2च्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! डहाणूकरवाडी दहिसर पासून सुटणाऱ्या Metroच्या मार्गात नेमके किती स्टेशन? जाणून घ्या!

दोन वर्षांनंतर गाजणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आखाडा, तारीखही ठरली, यंदा साताऱ्यात दंड कडाडणार

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.