“…अन्यथा आम्हाला गोळ्या घाला;” रविकांत तुपकर का झालेत आक्रमक?

| Updated on: Feb 05, 2023 | 10:08 PM

शेतकरी मोर्चास संबोधित करताना रविकांत तुपकर म्हणाले, आमच्या मागणी मान्य करत नसाल तर बंदुकीच्या गोळ्या आमच्या छातीत घाला. आम्ही मरायला आलो आहोत हे लक्षात घ्या.

...अन्यथा आम्हाला गोळ्या घाला; रविकांत तुपकर का झालेत आक्रमक?
रविकांत तुपकर
Follow us on

वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) येथे शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. पिकविमा (Crop Insurance), अतिवृष्टीची रखडलेली मदत व सोयाबीन-कापसाच्या दरवाढीची मागणी करण्यात आली. रखरखत्या उन्हातही हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. पिकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसविले आहे. तसेच अतिवृष्टीची मदत जाहीर करूनही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही, असा आरोप यावेळी रविकांत तुपकर यांनी केला. सोयाबीन-कापसाच्या दरवाढीसाठी केंद्र सरकारने कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आता आर-पारच्या लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत, असा इशाराही रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला.

१० फेब्रुवारीपर्यंत सरकारने आमच्या मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही तर ११ फेब्रुवारी रोजी आम्ही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर एकतर सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या नाहीतर आम्हाला गोळ्या घालाव्या, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला. तेथूनचं आंदोलनाचा भडका उडणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं. या मोर्चाचे आयोजन स्वाभीमानीचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले यांनी केले होते.

आम्ही मरायला आलो आहोत

शेतकरी मोर्चास संबोधित करताना रविकांत तुपकर म्हणाले, आमच्या मागणी मान्य करत नसाल तर बंदुकीच्या गोळ्या आमच्या छातीत घाला. आम्ही मरायला आलो आहोत हे लक्षात घ्या.

कुणाच्या बापाला घाबरायचं नाही

मला तुम्हाला एकच सांगायचं आहे. कुणाच्या बापाला घाबरायचं नाही. आपण भीक मागायला येथे आलेलो नाहीत. आपण आपल्या बापाचा हक्क मागायला आलो आहोत. बापाच्या कामाचा दाम मागायला येथे आलो आहोत.

हक्क मागण्याचा प्रत्येकाला अधिकार

स्वातंत्र्याच्या काळातही क्रांतीकारकांनी आंदोलनं केलीत. महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाचं हत्यार आमच्या हातात दिलं. जिथं अन्याय होईल त्या विरोधात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. हक्क मागण्याचा अधिकार आहे.

हक्क मागण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. पीकविमा मिळाला पाहिजे. सोयाबीनला योग्य भाव मिळाला पाहिजे. याशिवाय येथून हलायचं नाही, असा निर्धार यावेळी रविकांत तुपकर यांनी केला.