नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाहेरील नागरिकांना शिराळ्यात येण्यास बंदी
मंदिर परिसरात धार्मिक विधी लॉकडाउनच्या नियमांचे पालन करून होईल. त्यासाठी पाच व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. पालखीसाठी दहा व्यक्तींना पास देण्यात आला आहे. अंबामाता मंदिर नागरिकांसाठी बंद राहील. धार्मिक विधीसाठी ध्वनीक्षेपक आणि वाद्यास बंदी घालण्यात आली आहे.
सांगली : नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आज 12 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजल्यापासून ते 14 ऑगस्टच्या सकाळी आठ वाजेपर्यंत बाहेरील नागरिकांना शिराळा येथे येण्यास बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार 2020 मध्ये ज्याप्रमाणे नागपंचमी साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे यावर्षी नागपंचमी साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी ओंकार देशमुख यांनी केले आहे. नाग पकडणे आणि त्याची पूजा करणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन जाहीर करून काही निर्बंध घातले आहेत. (Outside citizens are banned from entering Shirala on the backdrop of Nagpanchami)
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार
मंदिर परिसरात धार्मिक विधी लॉकडाउनच्या नियमांचे पालन करून होईल. त्यासाठी पाच व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. पालखीसाठी दहा व्यक्तींना पास देण्यात आला आहे. अंबामाता मंदिर नागरिकांसाठी बंद राहील. धार्मिक विधीसाठी ध्वनीक्षेपक आणि वाद्यास बंदी घालण्यात आली आहे. शिराळा येथील नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरु नये. तसेच पालखी सोहळ्यात अडथळा निर्माण करू नये असे आव्हान करण्यात आले आहे. तसेच दूध, दवाखाने, औषध दुकाने वगळता सर्व सेवा 13 ऑगस्टला बंद राहतील. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. 65 नाग मंडळाच्या अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना कायदा आणि सुव्यवस्था याचे पालन करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आल्या आहेत.
शहरातील प्रमुख मार्ग व पालखी मार्गावर कडक बंदोबस्त ठेवणार
शिराळ्यात 175 पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी, 20 वाहतूक पोलीस, 19 महिला पोलीस कर्मचारी, पाच व्हिडीओ कॅमेरे, दोन ध्वनी मापक यंत्र, दोन दंगल नियंत्रक पथक असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिराळा शहरातील प्रमुख मार्ग व पालखी मार्ग येथे कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गुन्हे दाखल असणाऱ्या शहरातील दहा जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. (Outside citizens are banned from entering Shirala on the backdrop of Nagpanchami)
ऑफलाइन कोव्हिड लसीकरण पडताळणी प्रक्रियेपासून सुट्टी, लोकल प्रवाशांना आता ऑनलाइन ई-पास मिळवता येणार#Mumbai #MumbaiLocal #MumbaiLocalTrain #LocalTrainPasshttps://t.co/JBLdZ8vny2
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 12, 2021
इतर बातम्या
लॉर्ड्स कसोटीत रवी शास्त्रींच्या प्रशिक्षकपदाबाबत निर्णय होणार?, गांगुलीसह संघ व्यवस्थापनात चर्चा