Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हद्दच झाली… गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला ‘छप्परफाड’ गर्दी… काही तरुण थेट दुकानाच्या गाळ्यांवर चढले अन् छप्परच…

नगरच्या पारनेर तालुक्यात गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी झाली होती. बसायलाही जागा नव्हती. त्यामुळे काही तरुण थेट गाळ्यांच्या छप्परांवर चढले.

हद्दच झाली... गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला 'छप्परफाड' गर्दी... काही तरुण थेट दुकानाच्या गाळ्यांवर चढले अन् छप्परच...
gautami patil Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 9:34 AM

नगर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या क्रेझची आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. ज्या ज्या ठिकाणी गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम असतो तिथे मात्र पोलिसांना अधिक काम लागतं. त्याला कारणही तसंच आहे. ते म्हणजे गौतमीच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी. गौतमी जिथेही जाते तिथे तुफ्फान गर्दी होते. हजारो लोक जमतात. त्यात तरुण आणि वयस्क लोकांचाही समावेश असतो. एवढेच नव्हे तर गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी महिलाही मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. गर्दी एवढी होते की बसायलाही जागा राहत नाही. त्यामुळे लोक दाटीवाटीने बसून गौतमीचा कार्यक्रम पाहतात. एवढेच कशाला जागा मिळत नाही म्हणून काही तरूण चक्क झाडावर चढतात. नगरमध्ये तर हद्दच झाली. काही तरुणांनी थेट दुकानाच्या गाळ्यांवरच चढाई केली. त्यामुळे या दुकानाच्या गाळ्याचे छप्परच तुटले.

अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील जवळे येथे नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी पार पडला. पैलवान जयदीप सालके आणि सौरव लोखंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम अयोजिय करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रेक्षकांनी गौतमी पाटीलच्या अदाकारींवर ठेका धरला. यावेळी गौतमीच्या अदाकारींवर बेभान होऊन प्रेक्षक नाचले. तर काही प्रेक्षक कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामपंचायतीने बांधलेल्या गाळ्यांवरती चढल्याने एका गाळ्यांचे पत्रे फुटले. त्यामुळे गाळेधारकाला मनस्ताप सहन करावा लागला. आता या गाळेधारकाच्या गाळ्याच्या भरपाईची कुणीही दखल घेत नाहीये. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दुकानदाराला मात्र विनाकारण गौतमीच्या अदांचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.

हे सुद्धा वाचा

अन् शिवेंद्रराजे थिरकले

दरम्यान, साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा 30 मार्चला वाढदिवस होता. त्यामुळे जावळी तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जावळी तालुक्यातील कुडाळ येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवेंद्रराजे हे सुद्धा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवेंद्रराजे यांना स्टेजवर नाचण्याची विनंती केली. त्यामुळे शिवेंद्रराजेही स्टेजवर काहीवेळ स्टेजवर थिरकले. शिवेंद्रराजे यांनी हातवर करून ठेका धरला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रचंड शिट्ट्या वाजवत जल्लोष केला. यावेळी शिवेंद्रराजे यांनी गौतमी पाटील हिचा साडीचोळी देऊन सन्मान केला. यावेळी कार्यक्रमादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांचा पोलिसांनी चांगला समाचार घेऊन सौम्य लाठीचार्ज देखील केलेला पाहायला मिळाला.

गौतमी पाटील आणि इंदुरीकर वाद

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला गर्दी होत असली तरी तिच्यावर टीकाही मोठ्याप्रमाणात होत आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटील हिच्यावर टीका केली आहे. आम्ही अधिकचे पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. मात्र गौतमीने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी होते. काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षण देखील दिले जात नाही, अशी टीका इंदुरीकर महाराज यांनी केली होती.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.