‘महाबळेश्वर, पाचगणीमधले निर्बंध हटवा, आम्हाला जगू द्या’, व्यापाऱ्यांचं पालकमंत्री बाळासाहेब पाटलांना साकडं

'महाबळेश्वर, पाचगणीमधले निर्बंध ह़टवा, आम्हाला जगू द्या, असं साकडं महाबळेश्वर, पाचगणीमधल्या व्यापाऱ्यांनी साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना घातलं. (Pachgani Mahabaleshwar traders proposal To Balasaheb patil)

'महाबळेश्वर, पाचगणीमधले निर्बंध हटवा, आम्हाला जगू द्या', व्यापाऱ्यांचं पालकमंत्री बाळासाहेब पाटलांना साकडं
महाबळेश्वर, पाचगणीमधले निर्बंध हटविण्याची व्यापाऱ्यांची मागणी
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 11:34 AM

सातारा‘महाबळेश्वर, पाचगणीमधले निर्बंध ह़टवा, आम्हाला जगू द्या. कोरोना आणि लॉकडाऊनने आम्ही उध्वस्त झालोय. पण आता परिस्थिती पूर्ववत होत असताना आमचाही विचार करा. आमचे व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी द्या’, असं साकडं महाबळेश्वर, पाचगणीमधल्या व्यापाऱ्यांनी साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना घातलं. (Pachgani Mahabaleshwar traders proposal To Satara Guirdian Minister balasaheb Patil Over Corona Rules And Regulation)

निर्बंध शिथील करा, व्यापाऱ्यांचं पालकमंत्र्यांना साकडं

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता पॉझिटिव्हिटी रेट विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने निर्बंध कडक केले आहेत. याचा फटका इतर घटकांबरोबर जिल्ह्यातील पर्यटनाला बसला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनने मागील काही महिने दुकाने बंद असल्याने दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये माथेरान पॅटर्न लागू करावा, अशी मागणी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.

महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये माथेरान पॅटर्न लागू करा

सातारा शासकीय विश्रामगृहात महाबळेश्वर आणि पाचगणी या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन माथेरान पर्यटन स्थळावर ज्या पद्धतीने प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत, त्या नियमावली नुसार महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटन स्थळावरचे निर्बंध शिथिल करावेत या मागणीची निवेदन देण्यात आले.

योग्य तो निर्णय घेतो, पालकमंत्र्यांचा व्यापाऱ्यांना शब्द

व्यापाऱ्यांची अडचण समजू शकतो. येत्या काही दिवसांत कोरोनाची स्थिती पाहता आणि आकडेवारी पाहून योग्य तो निर्णय घेतला जाईल जेणेकरुन व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांना व्यापाऱ्यांशी बोलताना व्यक्त केला.

जिल्हाधिकाऱ्यांची वेट अँड वॉचची भूमिका

साताऱ्याचा कोरोना संसर्ग दर वाढ पाहता जिल्हाधिकारी शेखर निकम यांनी जिल्ह्यासह पाचगणी महाबळेश्वर पर्यटन स्थळीही निर्बंध जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने जिल्ह्यातील व्यापारी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. पर्यटन स्थळ असणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी मध्येही हीच नियमावली लागू केली असल्यामुळे या ठिकाणच्या स्थानिक व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन पाचगणी महाबळेश्वर पर्यटन स्थळ असल्याने माथेरान सारखी वेगळी नियमावली जाहीर करा अशी मागणी केली आहे.

मात्र याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अशी कोणतीही नियमावलीचा आदेश सध्यातरी राज्य सरकारकडून आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. शासनाकडून आदेश आल्यानंतर पुढची पावलं उचलली जातील, असा पवित्रा घेत सध्यातरी वेट अँड वॉचची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

(Pachgani Mahabaleshwar traders proposal To Satara Guirdian Minister balasaheb Patil Over Corona Rules And Regulation)

हे ही वाचा :

महाबळेश्वर, पाचगणीमध्ये निर्बंध जैसे थे, व्यापाऱ्यांमधून संताप, जिल्हा प्रशासनाची वेट अँड वॉचची भूमिका!

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.