Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PUBG : पजबी खेळता खेळता 16 वर्षांचा मुलगा इमारतीवरुन पडला! गंभीर जखमी मुलावर पालघरमध्ये उपचार सुरु

खेळण्याच्या नादातच शादान शेख या तरुणाचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. यात गंभीर जखमी झालेला शादान शेखला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

PUBG : पजबी खेळता खेळता 16 वर्षांचा मुलगा इमारतीवरुन पडला! गंभीर जखमी मुलावर पालघरमध्ये उपचार सुरु
पबजी खेळताना पडून जखमीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 8:58 AM

पालघर : पबजीचे (PUBG Game) अनेक किस्से वारंवार समोर आलेले आहेत. नुकतीच नाशिकमधून पबजी संदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली होती. काही दिवसांपूर्वी नाशिकचा (From Nashik to Nanded) एक मुलगा पबजी खेळता खेळता नांदेडला पोहचला. या मुलाला पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. दरम्यान, त्यानंतर आता पालघर (Palghar News) मध्ये पबजी गेम खेळत असताना 16 वर्षीय तरुण दुसऱ्या मजल्यावरून खाली पडलाय. पब जी गेमच्या नादात निर्माणाधीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून हा तरुण गंभीर जखमी झाला. इमारतीवरुन तरुण पडल्याचं कळताच त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही धक्क्दायाक घटना पालघरच्या शिरगाव इथं घडली. पबजी गेम खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेम खेळण्याच्या नादात सध्या तरुण इतके गुंग होऊन जातात की त्यांना कशाचच भान राहत नाही, हे या घटनेवरुन अधोरेखित झालंय. त्यामुळे गेमिंक करणाऱ्या तरुणांबाबत चिंता व्यक्त केली जातेय.

कशी घडली घडना?

एक 16 वर्षांचा तरुण निर्माणाधीन इमारतीमध्ये आपल्या मित्रांसोबत पबजी गेम खेळत होता. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हा तरुण गेम खेळत असताना दुर्दैवी घटना घडली. 16 वर्षांचा शादान मजहर शेख खेळण्याच्या नादात इतका मग्न झाला होता, की त्याला आपण नेमके कुठे आलो, याचं भानही उरलं नाही.

खेळण्याच्या नादातच शादान शेख या तरुणाचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. यात गंभीर जखमी झालेला शादान शेखला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमध्ये शादानवर उपचार सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

पबजी गेमचा नाद..

तरुणाईमध्ये गेल्या दोन वर्षात तरुणाईला पबजी गेमचा नाद लागल्याचं पाहायला मिळतंय. भारत चीन तणावानंतर पबजीसह 118 ऍपवर बंदी घालण्यात आली होती. मात्र त्याननंतर काही दिवसांपूर्वी PUBG Mobile गेम आता भारतात परतणार असल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हापासून हा गेम नेमका कधी लाँच होणार याची पबजी गेमच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.