इमारत बांधकामात मजुरीचे काम केले, मोबदला देण्यावरून झाला वाद, त्यानंतर घडली ही भयंकर घटना

त्या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. या वादाचा शेवट अतिशय वाईट झाला. सतंप्त झालेल्या मजुराने ठेकेदाराच्या भावावर जोरदार हल्ला केला.

इमारत बांधकामात मजुरीचे काम केले, मोबदला देण्यावरून झाला वाद, त्यानंतर घडली ही भयंकर घटना
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 3:47 PM

पालघर : वसईत बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर दोघे जण काम करत होते. त्यात एक ठेकेदाराचा भाऊ होता. त्याने दुसऱ्या मजुराच्या मजुरीचे दहा हजार रुपये भावाजवळ दिले. त्यानंतर तो गावाला निघून गेला. इतके ठेकेदाराच्या भावाने दहा ऐवजी फक्त आठ हजार रुपये सोबत असलेल्या मजुराला दिले. यावरून त्या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. या वादाचा शेवट अतिशय वाईट झाला. सतंप्त झालेल्या मजुराने ठेकेदाराच्या भावावर जोरदार हल्ला केला. यात ठेकेदाराचा भाऊ ठार झाला.

मोहम्मदच्या भावाने घेतला ठेका

मोहम्मद मोईन फारुख (वय 38) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अरबाज (वय 25) असे आरोपीचे नाव आहे. वसईच्या दिवनमान परिसरात कासा टेरेजा या इमारतीचे काम चालू आहे. या इमारतीचे काम करून देण्याचा ठेका मोहम्मद मोईन फारुखी यांच्या मोठ्या भावाने घेतला होता.

याच ठिकाणी मोहम्मद आणि अरबाज दोघेही मजुरीचे काम करीत होते. ठेकेदार हा गावी गेला असल्याने मोहम्मद यांच्याकडे त्याच्या मोठ्या भावाने 10 हजार रुपये अरबाजला देण्यासाठी दिले होते. मात्र मोईन याने 10 हजार न देता 8 हजार दिले होते.

हे सुद्धा वाचा

मोहम्मदच्या डोक्यात घातली फळी

दोन हजार देत नसल्याने मोहम्मद आणि अरबाजमध्ये रात्री वाद झाला. याच वादातून अरबाजने लाकडी फळी मोहम्मदच्या डोक्यात घातली. यात मोहम्मद हा जागीच ठार झाला आहे. घटनेनंतर पोलीस घटनास्थळावर गेले. मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरू केला आहे.

अशी माहिती माणीकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली. मजुरीचे पैसे कमी दिल्याच्या रागातून मजुराने ठेकेदारांच्या भावाची वसईत निर्घृणपणे हत्या केली. हत्या करून आरोपी फरार झाला.

वसईच्या दिवनमान परिसरातील कासा टेरेज या चालू इमारतीच्या कामाच्या ठिकाणी रात्री 11 च्या सुमारास घटना घडली. याबाबत माणीकपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या शोधासाठी 3 पोलिसांचे पथक रवाना केल्याची पोलिसांनी माहिती दिली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.