मित्रांसोबत पिकनिकला गेला होता, तुंगारेश्वरला पोहण्यासाठी पाण्यात उतरला अन्…

कॉलेजला दांडी मारुन सर्व मित्र फिरायला गेले. पण ही पिकनिक एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. शासनाची मनाई असतानाही तरुण मंडळी समुद्र किनारे, धबधब्यावर जात आहेत. यामुळे अशा घटना घडत आहेत.

मित्रांसोबत पिकनिकला गेला होता, तुंगारेश्वरला पोहण्यासाठी पाण्यात उतरला अन्...
तुंगारेश्वर धबधब्यात तरुण बुडालाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 10:48 AM

वसई : आता पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे पर्यटक धबधब्यावर पिकनिकला जात आहेत. वसईतील पाच मित्र कॉलेज चुकवून तुंगारेश्वरला फिरायला गेले होते. यावेळी एक तरुण धबधब्यावर पोहायला उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण पाण्यात बुडाला. राकेश सुरेला असे मयत 20 वर्षीय तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने तीन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.

कॉलेजला दांडी मारुन फिरायला गेला होता

राकेशा सुरला वसई पश्चिमेच्या आनंद नगर येथील जय वृंदावन येथे राहत होता. राकेश बारावीचा विद्यार्थी होता. कॉलेजला दांडी मारुन सोमवारी दुपारी राकेश मित्रांसोबत तुंगारेश्वर धबधब्यावर फिरायला गेला होता. यावेळी त्याला धबधब्यावर पोहण्याचा मोह झाला. राकेश धबधब्याच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने राकेश बुडाला.

धबधब्यावर 15 जुलैपर्यंत मनाई आदेश

सध्या मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातर्फे मीरा-भाईंदर आणि वसई-विरार परिसरातील समुद्र किनारे, धबधब्यावर 15 जुलैपर्यंत जाण्यास मनाई आदेश आहे. पोलीस आयुक्तालयातर्फे असे आदेश असताना स्थानिक पोलिसांमार्फत कोणताही पोलीस बंदोबस्त तेथे ठेवण्यात आला नाही. त्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

मावळमध्ये इंद्रायणी नदीत मुलगी बुडाली

मावळातील इंद्रायणी नदीच्या डोहात इंदोरी पुलाजवळ एक मुलगी पाण्यात बुडाल्याची घटना घडली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात मावळ वन्यजीव रक्षक शोध पथकांना यश आले आहे. प्रज्ञा कौशल भोसले असे या तरुणीचे नाव आहे. मावळ वन्यजीव रक्षक टीम आणि आपदा मित्र मावळ यांच्या रेस्कू टीमने, तसेच आंबी एमआयडीसी पोलीस पथकाने मुलीचा मृतदेह बाहेर काढला. मात्र ही मुलगी पाण्यात कशी पडली याचा शोध पोलीस घेत आहेत.

972176

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.