बालकांचे अपहरण करणारी टोळी, दोन बालकांची सुटका; आतापर्यंत इतके आरोपी जेरबंद
आठ वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार कोतवाली ठाण्यात मिळाली होती. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
परभणी : मुले चोरून विकणारे आणखी चार आरोपी जेरबंद करण्यात आले. परभणीतून अपहरण झालेल्या आणखी एका मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. लहान मुलांचे अपहरण करून परराज्यात लाखो रुपयांना विकणाऱ्या 10 आरोपींची टोळी आणि एक अल्पवयीन आरोपी मुलाला परभणी पोलिसांनी जेरबंद केली होती. त्यात एक त्यात अजून 4 आरोपींना परभणी पोलिसांनी आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यांसह ठाणे येथून अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून अपहरण झालेल्या आणखी एका मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात या प्रकरणात आता आरोपींची संख्या 15 इतकी झाली. अशी माहिती पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांनी दिली.
आठ वर्षाच्या मुलाचे केले होते अपहरण
या आरोपीकडून आणखीन काय काय गुन्हाची उकल होते याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागलेल्या आहे. आंतरराज्यात लहान मुलांचे अपहरण करून त्यांना लाखो रुपयांना विकणारी होळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या तपासातून पकडण्यात आली. आतापर्यंत पोलिसांनी कोतवाली हद्दीतील दोन आणि पालम येथील एक गुन्हा उघडकीस आणला. २०२२ मध्ये आठ वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार कोतवाली ठाण्यात मिळाली होती. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
दोन बालकांची सुटका
बालकांच्या तस्करीप्रकरणाचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यापैकी दोन बालकांची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं. या दोन अपह्रत बालकांना परभणीच्या बालकल्याण समितीपुढे हजर करण्यात आलं. पोलीस अधीक्षक रागसुधा आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, प्रदीप काकडे, संजय करनूर यांनी तपास केला. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.