Nanded Accident : नांदेडमध्ये पिकअप ऑटो आणि टिप्परचा भीषण अपघात, 5 ठार आणि 5 गंभीर जखमी
जारीकोट धर्माबाद येथील रहिवासी नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवार यााचा साखरा उमरखेड येथील पुजा पामलवार हिच्याशी 19 फेब्रुवारी रोजी विवाह झाला. त्यानंतर सोमवारी 21 फेब्रुवारी रोजी मांडव परतणीसाठी नवरा-नवरी आणि वऱ्हाडी उमरखेड येथे चालले होते.
नांदेड : भोकर ते किनवट रस्त्यावरील सोमठाणा पाटीजवळ मांडव परतणीसाठी चाललेल्या एका प्रवासी अॅपे ऑटो (Appe Auto)चा आणि ट्रक (Truck)चा सोमवारी सायंकाळी भीषण अपघात (Accident) होऊन यात 5 जण जागीच ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमधअये नवरीचाही समावेश असून नवरदेव गंभीर जखमी आहे. सदर अपघातग्रस्त अॅपे ऑटो धर्माबादहून यवतमाळमधील साखरा येथे चालली होती. यावेळी सोमठाणा शिवारात चटलावार यांच्या धाब्यासमोर येताच समोरुन येणाऱ्या विटा वाहतूक ट्रकने ऑटो धडक दिली. (Pickup auto and tipper crash in Nanded, 5 killed and 6 seriously injured)
पूजा ज्ञानेश्वर पामलवार (21 नवरी), दत्ता ज्ञानेश्वर पामलवार (22 नवरीचा भाऊ), माधव पुरबाजी सोपेवाड (30 ), सुनिल दिंगाबर धोटे (28) आणि अज्ञात इसमाचा मृतांमध्ये समावेश आहे. तर नागेश साहेबराव कन्नेवार (28 नवरदेव), अविनाश संतोष वंकलवाड, अभिनंदन मधुकर कसबे (16), सुनिता अविनाश तोपलवार (35) अशी जखमींची नावे असून जखमींमध्ये एका अनोळखी इसमाचाही समावेश आहे. सर्व जखमींना नांदेडमधील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
मांडव परतणीसाठी चालले होते सर्व जण
जारीकोट धर्माबाद येथील रहिवासी नवरदेव नागेश साहेबराव कन्नेवार यााचा साखरा उमरखेड येथील पुजा पामलवार हिच्याशी 19 फेब्रुवारी रोजी विवाह झाला. त्यानंतर सोमवारी 21 फेब्रुवारी रोजी मांडव परतणीसाठी नवरा-नवरी आणि वऱ्हाडी उमरखेड येथे चालले होते. यावेळी भोकर तालुक्यातील सोमठाणा पाटीजवळ सायंकाळी 6 वाजता समोरुन येणाऱ्या ट्रकने ऑटोला जबर धडक दिली. या अपघातात ऑटोचा चक्काचूर झाला असून नवरी पूजा पामलवारसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी बचाव कार्य सुरु असून पुढील कारवाई चालू आहे. (Pickup auto and tipper crash in Nanded, 5 killed and 6 seriously injured)
इतर बातम्या
Satara Crime : अल्पवयीन गतीमंद मुलीवर बलात्कार, नऊ आरोपींना अटक, साताऱ्यातील पाटण येथील घटना