गडचिरोलीत : नक्षलवाद्यांकडून दोन युवकांची हत्या (Murder) करण्यात आली. सुरजागड लोह प्रकल्प खनिज या नियुक्तीचा विरोध म्हणून नक्षलवाद्यांनी ही हत्या केल्याची माहिती आहे. दोन युवकांची हत्या एटापल्ली तालुक्यातील (Etapalli Taluka) झारेवाडा गट्टा परिसरात केली. मंगेश हिचामी व नवीन नरोटे अशा दोन युवकांची नावं आहेत. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून (Suspicion of Police News) नक्षलवाद्यांनी या युवकांची हत्या केली. राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे काल दौऱ्यावर होते. सुरजागड लोह प्रकल्प खनिजात काही युवकांना नियुक्त करण्यात आले होते. सुरजागड लोह प्रकल्प खनिज यांच्या विरोधात नक्षलवादी नेहमी पत्रकबाजी वाहन जाळपोळ याच्या अगोदर करीत होते. काल प्रकल्पात काही बेरोजगार युवकांना नियुक्ती करण्यात आल्या. त्यांचा विरोध दर्शविण्यासाठी नक्षलवाद्यांनी दोन युवकांची हत्या केली.
मंगेश हिचामी हा झारेवाडा येथील, तर नवीन नरोटे हा गोरगुट्टा येथील रहिवासी होता. मंगेश हा आत्मसमर्पित नक्षलवादी होता. त्यांनी तीन वर्षांपूर्वी नक्षल चळवळीला रामराम ठोकला होता. 13 एप्रिलच्या रात्री 19 वाजता मंगेशला त्याच्या घरून उचलण्यात आले. तर नवीनला रात्री एकच्या सुमारास घरातून नेले होते. जंगलात नेल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. दोघांचेही मृतदेह झारेवाडा व गट्टा मार्गावर आणून ठेवण्यात आले. काल सकाळी त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर पालकमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या नियुक्तीसह इतर प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रकल्पाला नक्षलवाद्यांचा विरोध आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी हत्या झाल्याचं सांगितलं जात आहे.