आधी परभणी आता नांदेडमध्ये घोळ, नेत्यांना प्रमोटी अधिकारीच का हवेत? थेट IAS अधिकाऱ्याला विरोध
अनेकदा राजकीय नेत्यांकडून आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी आग्रह होतो. असाच प्रकार आधी परभणीत पाहायला मिळाला आणि आता नांदेडमध्येही हेच घडताना दिसत आहे.
नांदेड : अनेकदा राजकीय नेत्यांकडून आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी आग्रह होतो. असाच प्रकार आधी परभणीत पाहायला मिळाला आणि आता नांदेडमध्येही हेच घडताना दिसत आहे. राज्य सरकारने नुकतीच नांदेड मनपाच्या आयुक्तपदी आयएएस निलेश गटणे यांची नियुक्ती केलीय. मात्र, स्थानिक पुढाऱ्यांना या जागेवर सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला सोडण्याची इच्छा दिसत नाहीये. त्यासाठी हे पुढारी थेट पालकमंत्र्यांना गळ घालताना दिसत आहेत.
सध्या नांदेड मनपाच्या आयुक्तपदी सुनील लहाने हे काम करत आहेत. आता राज्य सरकारने या जागेवर आयएएस निलेश गटणे यांची नियुक्ती केलीय. या नियुक्तीला स्थानिक नगरसेवकांचा विरोध होताना दिसतोय. त्यामुळे नियुक्ती जाहीर होऊनही गटणे यांनी मुंबईतील मुक्काम वाढवलाय.
स्थानिक नगरसेवकांकडून पालकमंत्री चव्हाण यांना गळ
दरम्यान, स्थानिक नगरसेवकांना आयएएस अधिकारी आयुक्तपदी नकोय. त्यामुळे या नगरसेवकांनी पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे लहाने यांना कायम ठेवण्याचा आग्रह केलाय. त्यामुळे गटणे यांच्या नावाची घोषणा हवेत विरण्याची चिन्हे निर्माण झालीयत.
हेही वाचा :
वृक्षारोपण मोहिम कागदावर, नांदेडमध्ये लागवडीसाठी आलेली रोपं रस्त्याच्या कडेला फेकून दिली!
राज्यात दोन वेगळी सत्ताकेंद्र निर्माण करण्याचं काम राज्यपालांकडून सुरु, नवाब मलिकांचा गंभीर आरोप
‘मी घटनेनुसार काम करतोय, कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही’, राज्यपालांचं प्रत्युत्तर
व्हिडीओ पाहा :
Politicians opposing new commissioner appointment in Nanded corporation