Atiq Ahmed : यूपीत एन्काऊंटर झालेले अतिक आणि अशरफ महाराष्ट्रात ‘शहीद’; ‘या’ जिल्ह्यात बॅनर्स झळकल्याने खळबळ

उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद याला चक्क शहीद ठरवण्यात आलं आहे. या दोघांचाही प्रयागराज येथे एन्काऊंटर करण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्रात दोघांनाही शहीद ठरवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Atiq Ahmed : यूपीत एन्काऊंटर झालेले अतिक आणि अशरफ महाराष्ट्रात 'शहीद'; 'या' जिल्ह्यात बॅनर्स झळकल्याने खळबळ
Atiq AhmedImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 9:25 PM

बीड : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांचा उत्तर प्रदेशात भररस्त्यात मीडियासमोरच एन्काऊंटर करण्यात आला. या गोळीबारात दोघेही जागीच ठार झाले. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अतिक अहमद याच्या दहशतीचा चॅप्टर एन्ड झाला आहे. मात्र, असं असलं तरी अतिक आणि अशरफ यांना शहीद ठरवण्यात आलं आहे. बीडच्या माजलगावमध्ये या दोन्ही भावांना शहीद ठरवणारे बॅनर्स झळकल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तिंनी हे बॅनर्स लावले आहेत. त्याला हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप घेतल्याने शहरात काही काळ तणाव होता.

उत्तर प्रदेशात चार दिवसांपूर्वी हत्या झालेला कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या समर्थनार्थ बीडच्या माजलगाव शहरातील एका चौकात बॅनर झळकविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या बॅनर्सवर या दोघांचा शहीद म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्याला हिंदू संघटनांनी आक्षेप घेताच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या मुद्द्यावरून अधिक आक्रमक झाली. त्यामुळे पोलिसांनीही या घटनेची तात्काळ दखल घेऊन हे बॅनर्स उतरवले आहेत. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन जणांना अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत. फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र, शहरातील परिस्थिती पूर्णपणे निवळली असल्याचं माजलगावचे पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

दोघांची कसून चौकशी

या बॅनर्सवर अतिक आणि अशरफ यांचा उल्लेख शहीद असा करण्यात आला आहे. तसेच दोघांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. वर्तमानपत्रातील बातमीचं कात्रणही छापण्यता आलं आहे. तसेच अतिक आणि अशरफ या दोघांचेही फोटो छापण्यात आले आहेत. मोहसीन भैय्या पटेल मित्र परिवार असं शेवटी बॅनर्सवर लावलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या दोघांचा अतिक अहमद गँगशी काही संबंध आहे का? या दोघांची पार्श्वभूमी काय? इतर दोघांचाही या गँगशी संबंध आहे काय? बॅनर्स लावण्यामागचा हेतू काय? याची पोलीस कसून चौकशी करत आहे.

पोलीस निलंबित

दरम्यान, आज सकाळी अतिक आणि अशरफ यांच्या मारेकऱ्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. अतिक अहमद आणि अशरफ अहमदला प्रयागराज मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन जाताना सुरक्षेत कसून केल्या प्रकरणी पोलिसांनी मोठा कारवाई केली आहे. शाहगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अश्वनी सिंह, धूमनगंज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या चौकीचे प्रभारी नावीं प्रीत पांडेय, पोलीस शिपाई शिव प्रसाद मोर्या, शिपाई जयमेश कुमार आणि संजय प्रजापती यांना निलंबित करण्यात आलं आहे. एसआयटीच्या रिपोर्टच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.