उद्धव भाऊंच्या काळात मैदानात उतरले होते, आता काय झालं?; ‘अजान’वरून प्रवीण तोगडिया यांचा राज ठाकरे यांना सवाल

बाब रामदेव चुकीचं बोलत नाहीत. लव्ह जिहादच्या कायद्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही गरज पडल्यास भेटेल.

उद्धव भाऊंच्या काळात मैदानात उतरले होते, आता काय झालं?; 'अजान'वरून प्रवीण तोगडिया यांचा राज ठाकरे यांना सवाल
pravin togadiaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 10:19 AM

बुलढाणा: मशिदीवरील भोंग्यावरून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचले आहे. उद्धव भाऊंच्या काळात अजानच्या मुद्द्यावरून राज ठाकरे मैदानात उतरले होते. आता काय झाले? असा सवाल करतानाच मित्रांचे सरकार आलंय. आता कधी आंदोलन करणार हे त्यांना विचारा; असा टोला प्रवीण तोगडिया यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. तोगडिया यांच्या या सवालावर राज ठाकरे आता काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अजाण आणि लाऊडस्पीकरबाबत राज ठाकरेंना विचारा काय झालं ते…? आता त्यांच्या मित्रांचं सरकार आलं आहे, त्यांना विचारा की कधी आंदोलन करून अजाण आणि लाऊडस्पीकर बंद करणार आहात..? उद्धव भाऊंच्या काळात तर मैदानात आले होते. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आंदोलन केलं तर मी त्यांच्या सोबत राहील, असं प्रवीण तोगडिया यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

औरंगजेबावर प्रेम करणारे अनेक

यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरूनही महाराष्ट्रातील राजकारण्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. महाराष्ट्रात औरंगजेबावर प्रेम करणारे छूट भैया अनेक आहेत. त्यांनी औरंगजेबाच्या जन्मगावी जावं. मुस्लिम लोकसंख्या वाढू नये यासाठी कायदा बनवावा. हिंदूंनी तर लोकसंख्येवर नियंत्रण केले आहे, असं तोगडिया म्हणाले.

रामदेवबाबांचं समर्थन

मुसलमान पाच वेळा नमाज अदा करूनही चुकीचं काम करतात, रामदेव बाबांच्या विधानाचं तोगडिया यांनी समर्थन केलं. बाब रामदेव चुकीचं बोलत नाहीत. लव्ह जिहादच्या कायद्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही गरज पडल्यास भेटेल.

गुजरात आणि हरयाणामध्ये लव्ह जिहाद कायदा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हा कायदा यापूर्वीच व्हायला पाहिजे होता. पण उशीर झालाय, असंही ते म्हणाले.

तरीही हिंदू सुरक्षित नाही

कलम 370 हटवूनही काश्मीरमधील हिंदू सुरक्षित नाही. यावर केंद्राने कडक पावल उचलली पाहिजेत. काश्मीर खोऱ्यातील सर्व तालिबानी मदरसे, मशीद वर बंदी घालायला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ते करतील अशी मला आशा आहे, असंही ते म्हणाले.

मोठा बंदोबस्त

दरम्यान, प्रवीण तोगडिया काल बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात येथे आले होते. खामगावच्या कोल्हटकर स्मारकामध्ये आयोजित हिंदू जनआक्रोश मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन केलं. प्रवीण तोगडिया यांना झेड प्लस सुरक्षा असल्याकारणाने बुलढाणा पोलीस दलाकडून खामगावमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात ठिकठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.