Prakash Ambedkar : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पण गृहमंत्र्यांनी…प्रकाश आंबेडकर यांनी डागली फडणवीसांवर तोफ
Devendra Fadnavis : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वखाली सरकार आहे. राज्यामध्ये लोकांच्या प्रश्न ला महत्व देण्या पेक्षा भाजपा सरकार इतर गोष्टीवर लक्ष देत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील सरकारवर निशाणा साधला. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वखाली सरकार आहे. राज्यामध्ये लोकांच्या प्रश्न ला महत्व देण्या पेक्षा भाजपा सरकार इतर गोष्टीवर लक्ष देत आहे, अशी त्यांनी केली. तर लाडकी बहीण योजना कायम करण्याच सरकार म्हणत आहे दीड हजार रुपयात घर चालत का ? नोकऱ्या देण्या ऐवजी लोकांनां गुलाम बनवण्याचे हे सरकार काम करीत आहे, असा हल्ला चढवला.
ओबीसी-मराठा वाद
ओबीसी साठी मी दौरे करीत आहे.सर्व पक्षांनी अजून ओबीसी आणि जरांगे यांच्या प्रश्न वरती का बोलत नाहीत ओबीसी आणि मराठा मध्ये हा रोष पसरत चालला आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या समूहातील लोकांनी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. वरिष्ठ लोकांनी काँग्रेस पक्षाचे काम केले. वर्गीकरण बरोबरच क्रिमिलियर ही अट घालण्यात आलीय. जे तंत्र जरांगे पाटील यांच्या कार्यकर्ते यांनी सर्वच पक्षातील नेत्यांना जाब विचारला. लोकसभा पाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा ही परिस्थिती निर्माण होईल राज्य सरकार या परिस्थितीला कंट्रोल करण्यात फेल झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.
सरकारवर हल्लाबोल
महिलांच्या संदर्भात अत्याचाराच्या बाबतीत RSS आणि भारतीय जनता पक्ष जवाबदार आहे. हिंसेची भाषा, करणे म्हणजे समाजात तेढ निर्माण होत आहे.समजत सायको निर्माण होत आहेत. हिंसाचार समाजामध्ये पसरवण्या पेक्षा लालबहादूर शास्त्री यांचे धोरण होत हम दोन हमारे दोन का अवलंबवंत नाहीत. यांच्या हातातील सत्ता लोकांनी काढून घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
भाजप-महाविकास आघाडी आंदोलन
कपडे फाड कार्यक्रम सुरुवात होईल, सत्तेत येन म्हणजे राज्याची तिजोरी लुटणे होय. नितीन गडकरी यांच्या खात्यातील रिपार्ट आलाय त्याची चर्चा कुठं नाहीये. मनमोहनसिंग यांच्या काळातील चर्चा होते. गडकरी हे विशिष्ट जातीचे आहेत म्हणून त्याची चर्चा होत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
गृहमंत्र्यांवर केली टीका
सत्ताधारी स्वतःच्या विरोधातच आंदोलन करीत आहेत. पंतप्रधान- मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पण गृहमंत्र्यांनी अद्याप माफी मागितली नाही अशी टीका त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. पुतळा पडला की पाडला यांची चौकशी व्हावी. मातीचे प्लास्टिकचे पुतळे 45 किलो मीटर हवा अली तरी हे पडले नाहीत, असे ते म्हणाले.
राजू शेट्टी यांच्यासोबत भेट
राजू शेट्टी यांच्या सोबत भेट झाली. समजोता झाल्यास पाहू, देशातील आदिवासी समूहाने एकत्र लढल पाहिजेय प्रत्येक जिल्ह्यात समिती स्थापन करून ओबीसी आणि इतर सोबत आघाडी करू विभागीय बैठक घेऊन चर्चा करून निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.