Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

32 गावांतील शेतकरी कुटुंबासह प्रकल्पस्थळी; भजन करत का वेधले शासनाचे लक्ष?

एक मार्च रोजी बैल बंडी मोर्चा काढण्यात आला. तसेच ठिय्या आंदोलन करण्यात आला. मानवी साखळी तयार करण्यात आली.

32 गावांतील शेतकरी कुटुंबासह प्रकल्पस्थळी; भजन करत का वेधले शासनाचे लक्ष?
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 11:24 AM

चंद्रपूर : जिल्ह्यातील दिंडोरा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फास ठरलाय. यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातील बाधित गावकऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी बैलगाडी मोर्चा काढला. हा बैलगाडी मोर्चा रात्रभर वर्धा नदी किनारी मुक्कामी ठेवण्याचा निर्धार आहे. भजने, गाणी म्हणत मानवी साखळी करून तीव्र लढ्याचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे. जमिनीला नव्या कायद्याप्रमाणे भाव मिळावा, गावांचे योग्य पुनर्वसन व्हावे , जनावरासह, मासेमार व शेतमजूर  यांना योग्य मोबदला मिळावा अशी त्यांची मागणी आहे. ह्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. आंदोलनस्थळी जाताना भजन म्हटली जात होती. बैलबंडीवर महिला, मुलं तसेच ज्येष्ठ बसले होते. आपल्या न्याय मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मुंबईत अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

सिंचन प्रकल्प झाला

हा प्रकल्प भद्रावती येथे १९९३ मध्ये होवू घातलेल्या निप्पोन डेनरो उद्योगाला पाणी मिळावे यासाठी होणार होता. मात्र निप्पोन डेनरो प्रकल्प रद्द झाल्यावर २०१७ ला हा प्रकल्प सिंचन प्रकल्प म्हणून जाहीर झाला. आज या प्रकल्पाची किंमत चौदाशे कोटी झाली आहे. सरकारने यात तातडीने लक्ष घालावे व ३२ गावाच्या लोकांना न्याय द्यावा यासाठी टोकाचे पाऊल उचलले गेले आहे. आंदोलनाचे प्रमुख पुंडलीक तिजारे म्हणाले, १९९९ ला जमीन अधिग्रहित करण्यात आली. तिन्ही जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना १८ हजार रुपये एकर प्रमाणे भाव दिला.

३२ गावांतील शेतकऱ्यांचा सहभाग

२०१७ मध्ये प्रकल्प सुरू करण्यात आला. २०१३-१४ च्या कायद्यानुसार जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा. काल एक मार्च रोजी बैल बंडी मोर्चा काढण्यात आला. तसेच ठिय्या आंदोलन करण्यात आला. मानवी साखळी तयार करण्यात आली. प्रकल्पग्रस्त ३२ गावांतील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बैलबंडी, ट्रॅक्टर, म्हतारे, वृद्ध यांचा सहभाग आहे. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.