Chandrapur Ganesh : सार्वजनिक गणेशोत्सवाची परवानगी, चंद्रपूर मनपाची एक खिडकी सुविधा, ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

https://pandal.cmcchandrapur.com/ येथे ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन चंद्रपूर मनपाने केले आहे. यंदा मनपातर्फे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

Chandrapur Ganesh : सार्वजनिक गणेशोत्सवाची परवानगी, चंद्रपूर मनपाची एक खिडकी सुविधा, ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
सार्वजनिक गणेशोत्सवाची परवानगी, चंद्रपूर मनपाची एक खिडकी सुविधाImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 4:45 PM

चंद्रपूर : महानगरपालिका हद्दीत गणेशोत्सवासाठी एक खिडकी योजनेची (One Window Scheme) सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी आता मंडळांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. सादर केलेल्या अर्जांची छाननी करून संबंधित विभागाकडून परवानगी मिळाल्यावर महापालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार आहे. शहरातील विविध गणेशोत्सव मंडळाच्या (Ganeshotsav Mandal) उपस्थितीत गणेशोत्सव 2022 साठीची आढावा व मार्गदर्शन सभा मनपा सभागृहात पार पडली. मनपा अधिकाऱ्यांसह पोलीस, वाहतूक, विविध विभागाचे अधिकारी व गणेश मंडळांचे प्रतिनिधी (representative of Ganesha Mandals) उपस्थित होते. परवानगीसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याचे मार्गदर्शन गणेश मंडळ सदस्यांना यावेळी करण्यात आले.

पीओपी मूर्ती ठेवणाऱ्यांवर होणार कारवाई

शासनाकडून गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्याची घोषणा केली असली, तरी गणेश मंडळांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महापालिका व इतर विभागाकडून रीतसर परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. शहर वाहतूक शाखा, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडील नोंदणी प्रमाणपत्र व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे नियमावली बाबत हमीपत्र घेऊन परवानगी दिली जाणार आहे. महापालिकेने दिलेली परवानगी मंडपाच्या दर्शनी भागावर मंडळांनी लावणे बंधनकारक राहणार आहे. सार्वजनिक मंडळाकडून निर्माल्य गोळा करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मनपातर्फे पीओपी मूर्ती ठेवणाऱ्या मंडळांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे.

येथे करा ऑनलाईन अर्ज

https://pandal.cmcchandrapur.com/ येथे ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन चंद्रपूर मनपाने केले आहे. यंदा मनपातर्फे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व रेन वॉटर हार्वेस्टींग देखाव्यास बक्षिसे मिळणार असल्याचं मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगितलं. शासनाने 2022 च्या गणेशोत्सवासाठी मंडप परवानगी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्व उत्सव मंडळांनी नियम पालन करणे बंधनकारक असणार आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.