‘त्यांनी’ आधीच हात दाखवलाय, कुणाच्या गालावर पडलाय हे सांगायची गरज नाही; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला हात अगोदरच दाखवलाय. कोणाच्या पाठीवर आणि कोणाच्या गालावर पडला हे सांगायची गरज नाही. त्यांचे भविष्य ठरलेलं आहे.

'त्यांनी' आधीच हात दाखवलाय, कुणाच्या गालावर पडलाय हे सांगायची गरज नाही; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात
एकनाथ शिंदे यांनी आधीच हात दाखवलाय, कुणाच्या गालावर पडलाय हे सांगायची गरज नाहीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 27, 2022 | 2:15 PM

अहमदनगर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योतिषाला हात दाखवल्याच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ज्यांना स्वत: भविष्य माहीत नाही, ते तुमचं भविष्य ठरवणार आहेत का? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी आधीच हात दाखवला आहे. तो कुणाच्या गालावर आणि कुणाच्या पाठीवर पडलाय हे सांगायची गरज नाही, असा घणाघाती हल्ला राधाकृष्ण विखे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला हात अगोदरच दाखवलाय. कोणाच्या पाठीवर आणि कोणाच्या गालावर पडला हे सांगायची गरज नाही. त्यांचे भविष्य ठरलेलं आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री झाले हे त्यांचे भविष्य होतं. जनतेने राज्यातील भविष्य ठरवलेलं आहे. पुढची 20 वर्ष शिंदे-फडणवीस सरकारच राज्यात सत्तेत राहील, असा दावा राधाकृष्ण विखे पाटलांनी केला.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी बोलताना भान ठेवायला हवे. सत्ता गेल्याने त्यांचा थयथयाट आणि चिडचिड होतेय. मात्र वाचाळपणा कराल तर एकटे पडाल, अशी टीकाही त्यांनी केली.

आपण जे बोलतोय त्याचे भान त्यांना नाहीये. अडिच वर्षे सत्तेत असताना आपल्याला शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. आपण दिलेल्या घोषणांची सत्तेत असताना पूर्तता केली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी वीज कनेक्शन तोडू नये अशा सूचना अगोदरच दिल्या आहेत.

आपण मात्र बांधावर जावून वीज कापण्याचं काम केलंय. पातळी सोडून जर वाचाळपाणा करत राहिला तर भविष्यात एकटेच पडाल, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

गेल्या अडिच वर्षात सरकार नावाची व्यवस्थाच राज्यात शिल्लक नव्हती. कोव्हिडमध्येही लोक वाऱ्यावर होते. नंतरही कुठली मदत झाली नाही. केंद्र सरकारचा हस्तक्षेप नसता तर राज्याची अवस्था काय झाली असती? असा सवाल करतानाच उद्धव ठाकरेंनी वास्तवाचं भान ठेवायला हवं, असा सल्लाही त्यांनी दिला.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.