Rahul Gandhi : शिवाजी महाराजांच्या विचाराचं संविधान कसं संपवलं जाईल याचा प्रयत्न सुरू, राहुल गांधी यांचा कोल्हापुरातून कुणावर घणाघात?

Rahul Gandhi Attack On BJP : राज्य घटना धोक्यात असल्याच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. कोल्हापूरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यावेळी त्यांनी संविधान धोक्यात असल्याचा सूर आळवला.

Rahul Gandhi : शिवाजी महाराजांच्या विचाराचं संविधान कसं संपवलं जाईल याचा प्रयत्न सुरू, राहुल गांधी यांचा कोल्हापुरातून कुणावर घणाघात?
राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 12:06 PM

राज्य घटना धोक्यात असल्याचा आरोप पुन्हा एकदा काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. त्यांनी मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल चढवला. कोल्हापूरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यावेळी त्यांनी संविधान धोक्यात असल्याचा सूर आळवला. त्यांनी शिवाजी महाराज यांच्या विचाराचे प्रतिबिंब राज्य घटनेत असल्याचे म्हटले. छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराची देशाला गरज असल्याचे ते म्हणाले.

काय म्हणाले राहुल गांधी?

शिवाजी महाराजांच्या विचाराचं संविधान कसं संपवलं जाईल याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदुस्थानातील संस्थांवर आक्रमण केलं जात आहे, लोकांना घाबरवलं जात आहे. धमकावलं जात आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माथं टेकतात. त्याला काही अर्थ नाही. तुम्ही शिवाजी महाराजांच्यासमोर नतसमस्तक होता तर तुम्हाला संविधानाचं रक्षण केलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या काळातही हीच लढाई सुरू होती. शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सुरू होता,. याच विचारधारेच्या लोकांनी राज्यभिषेक होऊ दिला नाही. ही आजची लढाई नाही. ही हजारो वर्षांपासूनची लढाई आहे. या विचारधारेच्या विरोधातच काँग्रेस लढत आहे.

हे सुद्धा वाचा

हा केवळ पुतळा नाही तर एक विचार

आज आपण मूर्तीचं अनावरण करत आहोत. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हा केवळ एक पुतळा नाही. पुतळा जेव्हा बनवतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विचारधारेला त्यांच्या कर्माला मनापासून समर्थन करतो. आपण इथे आलो किंवा कुणी मूर्तीचं अनावरण केलं… शिवाजी महाराज ज्या गोष्टींसाठी आयुष्यभर लढले, त्या गोष्टीसाठी आपण लढलो नाही तर पुतळा अनावरणाला काही अर्थ नाही. जेव्हा पुतळ्याचं अनावर करतो, तेव्हा शिवाजी महाराज जसं लढले, ज्या गोष्टींसाठी लढले तेवढं नाही, पण थोडं तरी काम आपण केलं नाही.

शिवाजी महाराजांनी देश आणि जगाला मोठा मेसेज दिला. देश सर्वांचा आहे. सर्वांना घेऊन चालायचं आहे. अन्याय करायचा नाही. असं शिवाजी महाराज म्हणायचे. त्यांच्या विचाराचं आज कोणतं चिन्ह असेल तर ते संविधान आहे. शिवाजी महाराज आणि संविधानाचं थेट कनेक्शन आहे. शिवाजी महाराजांनी जे सांगितलं ते २१ व्या शतकातील अनुवाद आहे. शिवाजी महाराज ज्या गोष्टींसाठी लढले ते सर्व या संविधानात आहे. त्यांचे विचारच या संविधानात आले आहेत. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज नसते तर संविधान नसतं, असे राहुल गांधी म्हणाले.

Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.