Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Rain | चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू, गेल्या 24 तासात 50 मिलिमीटर पावसाची नोंद…

चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात गेल्या 24 तासात 127 मिलिमीटर एवढ्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलीयं. राज्यात सध्या सर्वच ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आहे. पुढील काही तासात चंद्रपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Chandrapur Rain | चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू, गेल्या 24 तासात 50 मिलिमीटर पावसाची नोंद...
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 3:20 PM

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूयं. वर्धा नदीवर अमरावती-यवतमाळ जिल्ह्यात बांधलेल्या अप्पर व लोअर वर्धा या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढत झालीयं. महिनाभरात तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा (Maharashtra) तेलंगणाशी संपर्क तुटला आहे. बल्लारपूर शहराजवळच्या वर्धा नदी पुलावर पुराचे पाणी चढल्याने वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांना अडकून पडावे लागले आहे. वर्धा नदीच्या पुरामुळे आसपासच्या सर्वच पुलांवर पाणी (Water) चढल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र सध्या जिल्हात बघायला मिळते आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात गेल्या 24 तासात 127 मिलिमीटर पावसाची नोंद

चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात गेल्या 24 तासात 127 मिलिमीटर एवढ्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलीयं. राज्यात सध्या सर्वच ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आहे. पुढील काही तासात चंद्रपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्हात पुढील काही तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा

पुढील काही तासांमध्ये नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता

वर्धा, इरई व पैनगंगा या नदीकाठच्या गावांना प्रशासनाने अतिसतर्कतेचा इशारा दिलायं. कारण पुढील काही तासांमध्ये नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सातत्याने सुरू आहे. तसेच धरण पाणलोट क्षेत्रामध्ये देखील सातत्याने पावसाचा जोर वाढताना दिसतो आहे. यामुळे आता धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलायं.

दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला.
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.