Raj Thackersay : ‘समृद्धी महामार्ग साडे चार वर्षात पूर्ण, कोकणातील रस्ता 17 वर्षात नाही’; गडकरींना फोन केला तर म्हणाले…

रस्त्याच्या विषयावर बोलताना राज ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाकडे बोट दाखवत कोकणातील रस्त्यांच्या विषयाला हात घातला. समृद्धी महामार्ग जर साडे चार वर्षात पूर्ण होऊ शकतो मग कोकणातील रस्ता 17 वर्ष झालेत तरी का पूर्ण होऊ शकत नाही, असा सवाल करतद गडकरींना फोन केल्यावर ते काय म्हणाले तेही खुलेआम सांगितलं.

Raj Thackersay : 'समृद्धी महामार्ग साडे चार वर्षात पूर्ण, कोकणातील रस्ता 17 वर्षात नाही'; गडकरींना फोन केला तर म्हणाले...
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 8:13 PM

खेड : महाराष्ट्राच्या राजकारणात झालेले भूकंप पाहता कोण-कोणासोबत युती करेल याचा काही नेम नाही. आता परत एकदा मंत्रिमंडळविस्तारारून सत्तेत सहभागी झालेल्या मंत्रिपदांसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.  अशातच या सर्व राजकीय उलथापालथेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  बोलताना निशाणा साधला आहे. राज ठाकरे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी चिपळून दौऱ्यावर आहेत. खेडमधील सभेत बोलताना रस्त्यांचा मुद्दा काढत सत्तेत असणाऱ्यांवर टीका केली.

निवडणुका कशासाठी लढवायच्या, भविष्यात आपल्या पिढ्या काय पाहणार याचा विचार करा फक्त. आज या लोकांनी चिखलकरून ठेवलाय, या चिखलात घालायचा की नवनिर्माण करायचं आहे. मला तुमची साथ हवी आहे माझी अपेक्षा आहे. खेड नगररिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढाव्याच्या आहेत. खेडमध्ये निश्चित यश मिळणार, युत्या नको काही भानगडी नको, असं राज ठाकरे म्हणाले.

रस्त्याच्या विषयावर बोलताना राज ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाकडे बोट दाखवत कोकणातील रस्त्यांच्या विषयाला हात घातला. समृद्धी महामार्ग जर साडे चार वर्षात पूर्ण होऊ शकतो मग कोकणातील रस्ता 17 वर्ष झालेत तरी का पूर्ण होऊ शकत नाही. नितीन गडकरींना फोन केला तेव्हा कंत्राटदार पळून गेला असं सांगण्यात आलं. हे सगळं लक्षात ठेवा, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.

दरम्यान, हा दौरा पक्ष बांधणी आणि नवीन पदाधिकारी नियुक्तीसाठी आहे, भाषणबाजीसाठी नाही. त्यासाठी एक सही संतापाची उपक्रम राबवला त्याला प्रतिसाद मिळाला असल्याचंही ठाकरेंनी सांगितलं. त्यासोबतच नगरपरिषदेच्या निवडणूका स्वबलावर लढायच्या आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता राग व्यक्त करते का हे पाहायचं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.