VIDEO | हलगीच्या तालावर राजेश टोपेंनी फिरवली लाठीकाठी, अण्णाभाऊ साठेंच्या जन्मदिनी जल्लोष

महाराष्ट्र आज कोरोनाशी लढा देत असताना जालन्यात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीत सहभाग घेतला.

VIDEO | हलगीच्या तालावर राजेश टोपेंनी फिरवली लाठीकाठी, अण्णाभाऊ साठेंच्या जन्मदिनी जल्लोष
राजेश टोपे यांनी फिरवली लाठीकाठी
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 7:40 AM

जालना : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Annabhau Sathe) यांची जयंती रविवारी (एक ऑगस्ट) उत्साहात साजरी झाली. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी लाठीकाठी फिरवली. जालन्यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आरोग्यमंत्र्यांचं वेगळं रुप पाहायला मिळालं. यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.

‘संयुक्त महाराष्ट्र’ व्हावा यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी लढा दिला. महाराष्ट्र आज कोरोनाशी लढा देत असताना जालन्यात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीत सहभाग घेतला. इतकंच नाही, तर हलगीच्या तालावर त्यांनी लाठीकाठीही फिरवली. राजेश टोपेंचं हे रुप पाहून मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

पाहा व्हिडीओ :

कोण होते अण्णा भाऊ साठे?

अण्णा भाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात.

संबंधित बातम्या :

राज्यातील पहिले मेडिकॅब रुग्णालय जालन्यात सुरू; राजेश टोपेंच्या हस्ते लोकार्पण

(Rajesh Tope at Anna Bhau Sathe Procession in Jalna Video Viral)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.