Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासगी रुग्णालयांभोवतीचा फास आवळला, कोरोना रुग्णांकडून अधिक रक्कम वसूल केल्यास कारवाई, टोपेंचं फर्मान

खासगी रुग्णालयांभोवतीचा फास आवळला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना रुग्णांकडून अधिक रक्कम वसूल करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिलेत.

खासगी रुग्णालयांभोवतीचा फास आवळला, कोरोना रुग्णांकडून अधिक रक्कम वसूल केल्यास कारवाई, टोपेंचं फर्मान
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 2:42 AM

जालना : जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही अतिशय चिंतेची बाब असून अँटिजन तपासण्याच्या तुलनेत आरटीपीसीआर चाचण्याची संख्या अधिक प्रमाणात वाढविण्याबरोबरच संस्थात्मक अलगिकरणावर अधिक भर देण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री राजेश टोपे बोलत होते (Rajesh Tope order to action against private hospitals who are taking high charges for corona treatment).

रुग्णालयांवर कारवाई करून वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध करणार

राजेश टोपे म्हणाले, “खासगी दवाखान्यात कोविड बाधितांवर उपचारापोटी आकारण्यात येणाऱ्या दरांमध्ये नगर परिषद व नगरपंचायतनिहाय सुधारणा करण्यात येणार आहेत. जे खासगी दवाखाने शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकचे दर आकारातील अशा रुग्णालयांवर कारवाई करून वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात यावी. तसेच खासगी रुग्णालयात आवश्यकता नसतानाही रुग्णांना वेगवेगळ्या तपासण्या करण्यास सांगण्यात येतात. त्यामुळे रुग्णांवर अधिकचा आर्थिक भार पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखान्यातील डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना सूचना करण्याचे निर्देशही देण्यात आलेत.”

बाधित रुग्णांचे संस्थात्मक अलगिकरणावर भर द्यावा

“कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिराने रुग्णालयात भरती होत आहेत. अशा रुग्णांना त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्या रुग्णांची प्रकृती खालावते. त्यामुळे रुग्णांचा मृत्यूही होत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. सर्वसामान्य नागरिक सर्दी, ताप, खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानाही याकडे दुर्लक्ष करत आहेत. ते घरीच राहत आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांचे संस्थात्मक अलगिकरणावर भर देण्यात यावा. तसेच कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता घ्यावी,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, शिपाई, स्वच्छता सेवक यांची भरती होणार

“जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, कोविड केअर सेंटर येथे रुग्णांना अधिक चांगल्या प्रमाणात आरोग्य सेवा मिळाव्यात. तसेच उपलब्ध मनुष्यबळावर अधिक प्रमाणात ताण येऊ नये यासाठी डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, शिपाई, स्वच्छता सेवक यांची भरती केली जाईल. त्यासाठी तातडीने जाहिरात देऊन पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. या कामास प्रथम प्राधान्य देऊन हे काम कमी वेळेत जलदगतीने पूर्ण करण्यात यावे. जिल्ह्यातील प्रत्येक कोविड सेंटरवर 24 तास डॉक्टर्स, नर्स उपलब्ध राहतील तसेच याठिकाणी ठेवण्यात आलेल्या रुग्णांना पौष्टिक व चांगल्या दर्जाचे जेवण उपलब्ध करून देण्याबरोबरच या ठिकाणी स्वच्छता राहील, याचीही खबरदारी घ्यावी,” अशा सूचना पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

रेमेडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली

कोरोनाबधित गंभीर रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमेडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढलीय. त्यामुळे या इंजेक्शन्सचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच रुग्णालयात असलेल्या बेडच्या संख्येनुसार समान पद्धतीने इंजेक्शन्सचा पुरवठा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

दिवसेंदिवस कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ऑक्सिजनची मागणीही त्याप्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक खासगी रुग्णालयांच्या मागणीनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा. तसेच प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्ट उभारण्यात येत आहे. हे काम अधिक जलदगतीने करण्यात यावे. तसेच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या प्रत्येकाची नगरपालिकेने तंतोतंत नोंद ठेवण्याच्या सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यात निर्बंधांच्या कडक अंमलबजावणीच्या सूचना

ग्रामीण भागामध्ये खासगी डॉक्टरांनी कोविडची लक्षणे असलेल्यांचीच चाचणी करावी व शासनाने दिलेल्या सुचनांप्रमाणेच रुग्णांवर आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने 15 मे पर्यंत संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. काम नसताना विनाकारण अनेकजण बाहेर फिरत आहेत. जिल्ह्यात वाढत चाललेली कोरोना बधितांची संख्या कमी होण्यासाठी कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात निर्बंधाची पोलीस प्रशासनाने कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे आदेश

टाटा सन्स यांच्याकडून जिल्ह्यासाठी मास्क, पीपीई किट, व्हेंटिलेटर प्राप्त झाले असून त्याचे समान पद्धतीने वाटप करण्यात यावे. तसेच सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट करून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कोरोनापासून बचाव होण्यासाठी लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याची गरज असल्याचे सांगत 1 मेपासून 18 वर्षावरील प्रत्येकाला लस देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. लसीची उपलब्धता कमी असल्यामुळे जालना जिल्ह्यात 5 ठिकाणी या वयोगटातील व्यक्तींना लस देण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आले. ज्या प्रमाणात लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे केंद्रात वाढ करत लसीकरण पूर्ण करण्याच्यादृष्टीने सुक्ष्म व काटेकोर असे नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी दिल्या.

यावेळी यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख,अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी सामान्य शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसैय्ये, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप,उपविभागीय अधिकारी शशीकांत हदगल, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, जिल्हा शल्यचित्किसक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगांवकर,नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर, डॉ. संतोष कडले, डॉ. संजय जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीस संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

कट्टर काँग्रेसी, थेट उद्वव ठाकरेंना उपोषणाचा इशारा; वाचा, कोण आहेत कैलास गोरंट्याल?

जालन्यात प्रत्येक रुग्णालयाचे फायर ऑडिट होणार, ऑडिटसाठी ऑक्सिजन मॅनेजरची नियुक्ती

कोरोनाबाधित मृताच्या बोटाचे ठसे वापरले, ‘फोनपे’तून पैसे ट्रान्सफर, जालन्यातील वॉर्डबॉयचा प्रताप

व्हिडीओ पाहा :

Rajesh Tope order to action against private hospitals who are taking high charges for corona treatment

खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं
खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं.
'फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की..'; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप
'फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की..'; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप.
नागपुरातील राड्यानंतर शिंदेंनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं
नागपुरातील राड्यानंतर शिंदेंनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं.
'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार
'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार.
'...तो पुरूष नाहीच', सुळेंची मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा
'...तो पुरूष नाहीच', सुळेंची मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा.
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी.
विधानभवनात पत्रकारांना धक्काबुक्की, माध्यमांच्या प्रतिनिधींचंच आंदोलन
विधानभवनात पत्रकारांना धक्काबुक्की, माध्यमांच्या प्रतिनिधींचंच आंदोलन.
'अजितदादा... जरा जमिनीवर या', करूणा शर्मांनी अजित पवारांना फटकारलं
'अजितदादा... जरा जमिनीवर या', करूणा शर्मांनी अजित पवारांना फटकारलं.
हल्ले करणारे चेहरे ओळखीचेच; नागपूर प्रकरणावर राऊतांचा गंभीर आरोप
हल्ले करणारे चेहरे ओळखीचेच; नागपूर प्रकरणावर राऊतांचा गंभीर आरोप.
'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले
'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले.