अकोल्यात पावणेदोन कोटी वेळा श्रीराम लिहून केले नामस्मरण!, रजनीकांत कडू यांचा अनोखा उपक्रम
देवाच्या व्यतिरिक्त कुठलाही मोह मोठा नाही, असे या संतांकडून ज्ञान मिळत होते. श्रीरामांचे स्मरण कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही वेळी केल्यास आत्मसमाधान आणि आत्मचिंतन (Introspection) होते, असेही ते सांगत होते. त्यानुसार रजनीकांत कडू यांनी श्रीराम हे तीन अक्षर कागदावर लिहिण्यास सुरवात केली.
अकोला : देवावर आपली श्रद्धा वेगवेगळ्या पद्धतीने दाखविण्यासाठी अनेक भक्त नानाविध उपाय करतात. देवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांचेही प्रयोग इतर भक्तांसाठी आदर्श ठरतात. या कठीण प्रार्थनेमध्ये अनेकांकडून श्रद्धाभाव दाखविण्याचा प्रयत्न केल्या जातो. अकोल्यातील अशाच 71 वर्षीय वृद्धाकडून श्रीरामाप्रती (Shriram) आपली श्रद्धा अर्पण करण्यात आली. कोणत्याही लालसेपोटी नव्हे तर फक्त नामस्मरण आणि नामजप करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम गेल्या 33 वर्षांपासून अजूनही अबाधित ठेवला आहे. रजनीकांत महादेव कडू (Rajinikanth Kadu) असे श्रीरामभक्त व्यक्तीचे नाव आहे. रजनीकांत कडू हे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात पंप ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. आधीपासूनच धार्मिक असलेले रजनीकांत हे कणकेश्वर देवी, रमेशजी ओझा यांच्यासह आदी संतांचे प्रवचन ऐकत होते. त्यांचे प्रवचन ऐकूण त्यांना श्रीराम स्मरण केल्याने सर्व दु:ख दूर होतात. देवावर विश्वास ठेवल्यास सर्व कामे सहज होतात. त्यामुळे देवभक्ती असे आवश्यक आहे. देवाच्या व्यतिरिक्त कुठलाही मोह मोठा नाही, असे या संतांकडून ज्ञान मिळत होते. श्रीरामांचे स्मरण कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही वेळी केल्यास आत्मसमाधान आणि आत्मचिंतन (Introspection) होते, असेही ते सांगत होते. त्यानुसार रजनीकांत कडू यांनी श्रीराम हे तीन अक्षर कागदावर लिहिण्यास सुरवात केली.
3 हजार 424 पानांवर लिखाण
1989 पासून त्यांनी श्रीराम नाव हे लिहिण्यास सुरवात केली. श्रीराम हे नाव कागदावर लिहिताना त्या अक्षरापासून आणखी एखाद्या देवाचे नाव लिहिण्यास सुरवात केली. दररोज त्यांना जसा वेळ मिळेत त्या वेळात ते श्रीराम हे नाव दररोज पानांवर लिहित होते. एका पानावर जवळपास 500 ते 540 अक्षर ते लिहीत होते. त्यांना आतापर्यंत जवळपास 3 हजार 424 पानांवर हे लिखाण केले आहे. एक कोटी 68 लाख शब्द लिहिले आहेत. या शब्दांमध्ये फक्त श्रीरामांचेच नाव आहे.
संकटांचा सामना केला
जेव्हापासून मी श्रीराम लिहिण्यास सुरवात केली तेव्हापासून माझ्यावर संकट आले नाही. जेही संकट आले, त्या संकटांचा लिलया मी सामना केला आहे. त्यामुळे श्रीराम या शब्दामध्ये किती ताकद आहे, हे मला कळले असल्याचे ते म्हणाले श्रीरामांच्या लिखाणामधून जर माझे सर्व संकट दूर होत असतील तर ही माझ्यासाठी चांगलीच बाब आहे, असेही श्रीरामभक्त रजनीकांत कडू म्हणाले.