कृषिमूल्य आयोग एफआरपी सरकारच्या सोयीनुसार ठरवतं की उत्पादन खर्च पाहून? : राजू शेट्टी
ऊसाच्या एफआरपी क्विंटल मागे 50 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. मात्र या निर्णयावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील आता या विषयात आक्रमक भूमिका घेतलीय.
कोल्हापूर : ऊसाच्या एफआरपी क्विंटल मागे 50 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. मात्र या निर्णयावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील आता या विषयात आक्रमक भूमिका घेतलीय. एकूणच एफआरपीच्या वाढीव रकमेचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झालीय.
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी (25 ऑगस्ट) पार पडली. या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ऊसाच्या एफआरपीमध्ये या वर्षीच्या हंगामासाठी प्रतिक्विंटल 50 रुपयांची वाढ देण्यात आलीय. कृषिमूल्य आयोगाने सुचवलेल्या वाढीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, क्विंटल मागे 50 रुपयांची वाढ केल्याने शेतकरी नेते आणि ऊस उत्पादकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
कृषिमूल्य आयोग एफआरपी सरकारच्या सोयीनुसार ठरवतं की उत्पादन खर्च पाहून? : राजू शेट्टी@rajushetti #RajuShetti #Farmer #Sugarcane #FRP pic.twitter.com/PpS6Mph8yT
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) August 26, 2021
“कृषिमूल्य आयोग एफआरपी सरकारच्या सोयीनुसार ठरवतं की उत्पादन खर्च पाहून?”
कृषिमूल्य आयोग एफआरपी ठरवताना सरकारची सोय बघून ठरवते की उत्पादन खर्च पाहून हे अगोदर स्पष्ट करावे, असा हल्लाबोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. केवळ राजकीय सोयीसाठी कृषिमूल्य आयोग एफआरपीची कमी रक्कम ठरवत आहे. मात्र, यात शेतकरी भरडला जाणार आहे, असंही राजू शेट्टींनी नमूद केलं.
“किमान एफआरपी 3500 रुपयांपर्यंत गेली तरच शेतकरी तग धरू शकेल”
दुसरीकडे सामान ऊस उत्पादक शेतकरी देखील या निर्णयावर समाधानी नसल्याचं दिसतंय. वाढत चाललेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही रक्कम तुटपुंजी आहे. सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून त्यांची चेष्टा का करते? असा उद्विग्न सवाल या शेतकऱ्यांनी केलाय.
एसी रूममध्ये बसून एफआरपी रक्कम ठरवण्याआधी कृषिमूल्य आयोगाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहावी, असं पोटतिडकीनं सांगतानाच सध्याची परिस्थिती पाहता सध्या एफआरपीची रक्कम प्रतिटन 2850 इतकी आहे. दरवाढीनंतर ती 2900 रुपये इतकीच होणार आहे. एफआरपीची रक्कम किमान 3500 रुपयांपर्यंत गेली तरच शेतकरी तग धरू शकेल, अशी भावना हे ऊस उत्पादक शेतकरी बाळासाहेब पाटील आणि संजय चौगुले यांनी व्यक्त केली.
शेती मशागत, लागण, खत खर्चात दुपटीपेक्षा जास्त वाढ, एफआरपीतील वाढ नगण्य
शेतीची मशागत, लागण, खते यामध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. शिवाय नुकत्याच आलेल्या महापुराने पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांचं कंबरडं मोडलंय. त्यातच एफआरपीच्या रकमेत झालेली नगण्य वाढ म्हणजे आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची भावना ऊस उत्पादकांमध्ये तयार झालीय. त्यामुळे सरकारने याचा फेरविचार न केल्यास येत्या काळात एसआरपीच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
एफआरपीचे तुकडे केल्यास कुणासोबतही दोन हात करायची तयारी, राजू शेट्टींचा महाविकासआघाडीला इशारा
पायातलं हाता घ्या, राजू शेट्टींची 23 ऑगस्ट रोजी आक्रोश मोर्चाची हाक
धनंजय महाडिकांनी घेतली राजू शेट्टींची भेट, जिल्हापरिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर चर्चेला उधाण
व्हिडीओ पाहा :
Raju Shetti criticize new FRP increase of 50 rupees called insufficient