“सत्तेसाठी किती आले अन् गेले, पण आठवले भाजपासोबतच राहिले…” भाजपच्या मंत्र्याने आठवलेंच्या स्टाईलमध्ये त्यांचा गौरव केला
घोषणा देवून पक्षाची प्रतिष्ठा वाढत नाही तर कार्यकर्त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकाला जाऊन मदत केली पाहिजे, तरच समाजाचा विकास होत असतो असं मतही त्यांनी यावेळी मांडले.
शिर्डी : सत्तेसाठी किती आले अन् गेले किती , पण आठवले साहेब भाजपासोबतच राहिले, असे कवितेच्याच आणि रामदास आठवले यांच्या भाषेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा गौरव केला आहे. शिर्डीमध्ये आरपीआय आठवले गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि आठवले गटामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदललेली असल्याचे सांगत.यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, सत्तेसाठी किती आले अन गेले, पण आठवले भाजपा सोबतच राहिले अशा शब्दात त्यांनी त्यांचा गौरव केला आहे.
तर त्याच वेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याविषयीही त्यांनी कौतूक केले आहे. नरेंद्र मोदींचा जगभर गौरव होत असल्याचे सांगत त्यांच्यामुळे भारताच्या विकासात मोठा बदल झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कामाविषयी बोलताना त्यांनी म्हटले की, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून रामदास आठवले हे शोषितांसाठी काम करत असून डॉ. बाबासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे जात आहात.
त्यामुळे तुमच्यासोबत त्या कार्यकर्त्यांचेदेखील आभार मानले आहे. यावेळी झालेल्या आरपीआयच्या अधिवेशनातील ठरावांना आमची मान्यता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
देशाच्या राजकारणात रामदास आठवले आपल्या कामामुळे त्यांचे नाव देशभर झाले आहे. तसेच नऊ वर्षात रामदास आठवले यांच्यावर एकही भ्रष्ट्राचाराचा आरोप नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वयोश्री योजनेचा लाभ सर्वात जास्त अहमदनगर जिल्ह्याला मिळाला असल्याचेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी बोलून दाखवले. घोषणा देवून पक्षाची प्रतिष्ठा वाढत नाही तर कार्यकर्त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकाला जाऊन मदत केली पाहिजे, तरच समाजाचा विकास होत असतो असं मतही त्यांनी यावेळी मांडले.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवरही टीका करताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मविआच्या वज्रमुठीलाही आता तडा गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.