माते ! एकनाथ शिंदे यांना सुबुद्धी दे… चांगली बुद्धी दे आणि…; रामदास कदम यांनी देवीला काय घातले साकडे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडच्या गोळीबार मैदानावर भव्य सभा होणार आहे. या सभेची पूर्ण तयारी झाली आहे. संध्याकाळी होणारी ही सभा अतिविराट होण्याचा दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे.

माते ! एकनाथ शिंदे यांना सुबुद्धी दे... चांगली बुद्धी दे आणि...; रामदास कदम यांनी देवीला काय घातले साकडे?
ramdas kadamImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 12:19 PM

खेड : कोकणातील खेडमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या मैदानावर सभा घेतली होती, त्याच मैदानावर ही सभा होत असून यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी या सभेचं आयोजन केलं असून सभेची तयारी पूर्ण झाली आहे. या सभेपूर्वी आज सकाळी रामदास कदम यांनी कोटेश्वरी मानाई देवीची पूजा केली. देवीला साकडं घातलं. माते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुबुद्धी दे… चांगली बुद्धी दे… कोकणासाठी चांगल्या घोषणा होऊ दे, असं साकडच रामदास कदम यांनी देवीला घातलं आहे.

कोटेश्वरी मानाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर रामदास कदम यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. आज खेडमध्ये जाहीर सभा आहे. उद्धव ठाकरे 5 तारखेला खेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की माझ्या हातात द्यायला काही नाही. मी खाली हाताने आलोय. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांच्या हातात देण्यासारखं पुष्कळ काही होतं. पण ते त्यांनी दिलं नाही. आज एवढंच साकडं घातलंय. मुख्यमंत्री येत आहेत. माझ्या कोकणासाठी काही तरी देऊन जाऊ देत, असं शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले.

हे सुद्धा वाचा

कोकणाला लाभ व्हावा

आजची सभा राजकीय नको व्हायला. या सभेचा लाभ माझ्या कोकणासाठी व्हावा. महाराष्ट्राचे अनेक चांगले निर्णय शिंदे-फडणीस यांनी घेतले. निर्णयाचा सपाटा त्यांनी लावला आहे. केंद्रातून निधी आणत आहेत. पैसा आणत आहेत. आणि महाराष्ट्राच्या हिताचे, पोलिसांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. माझा कोकणही विकासापासून लांब असता कामा नये. म्हणून देवीला आज साकडं घातलंय, माते एकनाथ शिंदेंना सुबुद्धी दे… चांगली बुद्धी दे आणि कोकणासाठी चांगल्या घोषणा त्यांच्याकडून होऊ देत असं साकडं देवीला घातलं आहे, असं कदम म्हणाले.

शिंदे- फडणवीस झटपट निर्णय घेतात

मी माझ्या कारकिर्दीत अनेक मुख्यमंत्री मी पाहिले. 32 वर्ष आमदार म्हणून काम केलं. मंत्री म्हणून काम केलं. 9 ते 10 मुख्यमंत्री मी जवळून पाहिले. पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची पद्धत पाहतोय… तिथल्या तिथं आणि तातडीने निर्णय घेण्याची क्षमता या दोघांमध्ये आहे. दोघे एकमताने, संगनमताने निर्णय घेतात. केंद्र सरकार आपल्यासोबत असेल तर जास्तीत जास्त निधी कसा आणू शकतो ते या जोडीने महाराष्ट्राला दाखवून दिले. त्यामुळे माझी देवी या दोघांच्या पाठी उभी असेल असं साकडं देवीला घातलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

रेकॉर्ड ब्रेक सभा होईल

यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर बोलण्यास नकार दिला. मी टीकेकडे लक्ष देत नाही. मी माझं काम करत असतो. शिवसेनेचे वाईट दिवस असताना मातोश्रीच्या पाठी खंबीर उभा राहणारा मी आहे. सगळ्या टीकांची उत्तरं आजच्या सभेतून मिळेल. कोकणातील जेवढ्या सभा झाल्या त्या सभांचा रेकॉर्ड ब्रेक होईल, असा दावा करतानाच शरद पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय? ते देश पाहतोय. ज्यांना कावीळ असते त्यांना सर्व पिवळं दिसतंय. यावर राऊतांनी बोलावं हे हस्यास्पद आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.