Video | मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर, चरायला गेलेल्या जाफराबादी म्हशी गेल्या वाहून, एकीचा मृत्यू

गुहागर तालुक्यातील पडवे गावात पुराच्या पाण्यात तीन म्हैशी गेल्या वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Video | मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर, चरायला गेलेल्या जाफराबादी म्हशी गेल्या वाहून, एकीचा मृत्यू
BUFFALO SWEPT AWAY
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 8:35 PM

रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील पडवे गावात पुराच्या पाण्यात तीन म्हशी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाहून गेलेल्या म्हशींपैकी दोन म्हशींना वाचवण्यात यश आले असून त्या गंभीर अवस्थेत आहेत. तर एक म्हैस मृत्युमुखी पडली आहे. (Ratnagiri Guhagar Three buffaloes swept away in the flood man demands compensation)

तीन म्हैशी व एक रेडकू वाहून गेले

मिळालेल्या माहितीनुसार गुहागर तालुक्यातील पडवे गावातील वसंत राऊत यांच्या मालकीच्या चार म्हैशी आज सकाळी काताळे नवानगर परिसरात चरण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर घरी परतताना पावसाचा जोर वाढल्याने या दोन गावादरम्यान असणाऱ्या डावाचा पऱ्या या ओढ्याला मोठा पूर आला. याच पुरात राऊत यांच्या तीन म्हैशी व एक रेडकू वाहून गेले. यापैकी दोन म्हशी व रेडकाला वाचवण्यात राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले. मात्र एक म्हैस या ओढ्यातून वाहून जाऊन जयगड खाडीमध्ये गेली. शेवटी ही म्हैस मृतावस्थेत आढळली.

मृत म्हशीची अंदाजे किंमत एक लाख रुपये

या घटनेची गंभीर दखल घेत ग्रामसेवक व तलाठी यांनी तत्काळ परिस्थितीची पाहणी करुन पंचनामा केला आहे. राऊत यांच्या म्हशी जाफराबादी जातीच्या असल्याने मृत म्हशीची अंदाजे किंमत एक लाख रुपये व गंभीर जखमी झालेल्या दोन म्हशींच्या उपचारासाठी पंचवीस-पंचवीस हजार रुपये असा एकूण दीड लाख रुपये नुकसान भरपाईचा पंचनामा करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा

वसंत राऊत हे गेली अनेक वर्ष पडवे गावात दुग्ध व्यवसाय करत आहेत. परिस्थिती बेताची असल्याने पोस्टमन म्हणून निवृत्त झाल्यानंतरसुद्धा त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपला दूध व्यवसाय चालू ठेवला आहे. मात्र आज घडलेल्या प्रकारामुळे राऊत यांच्यावर मोठा आघात झाला आहे. तरी शासन स्तरावरून त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा पडवे काताळे परिसरातून व्यक्त होत आहे.

इतर बातम्या :

एक-दोन नव्हे तर चक्क 26 कोटींची व्हेल माशाची उलटी, अंधेरी-मालाडमधून पाच जणांना बेड्या

Maharashtra Rain Update: राज्यात येत्या 5 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, IMD कडून रेड, ऑरेंज ॲलर्ट जारी

इफकोचं पुढचं पाऊल, नॅनो यूरीयाचे ब्राझीलसह अर्जेंटिनात प्लांट उभारणार

(Ratnagiri Guhagar Three buffaloes swept away in the flood man demands compensation)

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.