Ratnagiri News : रत्नागिरीत भूस्खलनाचा धोका आता आधीच कळणार! वीजेशिवाय चालणारी RTDA यंत्रणा बजावणार महत्त्वाची भूमिका

Ratnagiri Landslide News : रिअल टाईम डेटा अक्विझिशन असं या सिस्टमचं नाव आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सिस्टबद्दल माहिती दिली आहे.

Ratnagiri News : रत्नागिरीत भूस्खलनाचा धोका आता आधीच कळणार! वीजेशिवाय चालणारी RTDA यंत्रणा बजावणार महत्त्वाची भूमिका
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 6:52 AM

मुंबई : पूर (Flood News) आणि भूस्खलनाबाबच (Landslide) अत्यंत अचूक माहिती देण्यासाठी एका विशिष्ट सिस्टची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे आता भूस्खलनामुळे होणाऱ्या जीवितहानीसह आर्थिक हानीदेखील टाळता येऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. रिअल टाईम डेटा अक्विझिशन (RTDA) असं या सिस्टमचं नाव आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सिस्टबद्दल माहिती दिली आहे. या सिस्टममुळे भविष्यात पूर आणि भूस्खलनाबाबत अलर्ट मिळू शकेल. त्यामुळे भविष्यातील धोका टाळण्यासाठी आधीच यंत्रणेला सतर्क करण्यासाठीची खबरदारी घेता येणं शक्य होणार आहे. विशेष म्हणजे ही यंत्रणा विजेशिवाय काम करु शकणार आहे. वीज पुरवठ्याशिवाय ही यंत्रणा काम करेल, असंही सांगण्यात आलंय. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षाक भूस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. त्या पार्श्वभूमीवर ही नवी आरटीडीए ही यंत्रणा प्रभावी ठरेल, असं सांगितलं जातंय.

रत्नागिरी जिल्ह्याचा आरटीडीएची काय गरज?

2021 या वर्षात चिपळूण शहराला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. चिपळुणातील पुरामध्ये 20 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर त्याचदरम्यान, कोरोना रुग्णही दगावले होते. पुराचं पाणी रुग्णालयाच्या आवारात घुसल्यानं रुग्णसेवेवरही परिणाम झाला होता. काही रुग्ण दगावलेही होती. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याचा बहुतांश भाग हा किनारपट्टीला लागून आहे. अशा वेळी मुसळधार पावसाचा मोठा परिणाम या जिल्ह्यावर दिसून येतो.

जिल्हाधिकारी काय म्हणाले?

दरम्यान, आपत्तीच्या वेळी गावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी आणि त्यासाठी अलर्ट जारी करण्यासाठी वेळी यंत्रणा राबवणं अतिशय गरजेचं आहे. अशा परिस्थितीत जर लोकांना त्यांच्य सामानासह, पशुधनासह सुरक्षित स्थळ गाठणं शक्य झालं, तर जीवितहानी टळेल आणि आर्थिक नुकसानही टाळता येईल. त्यामुळे या नव्या यंत्रणेचा फायदा होईल, असं रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

आरटीडीए प्रणाली ही दोन्ही बाजूंनी संपर्क साधणारी सिस्टम आहे. भूस्खलनामुळे एखादं गाव बाधित झालं, तर स्थानिक अधिकाऱ्यांनी या सिस्टमच्या मदतीने संपर्क साधता येतो. तसंच मोबाईल टॉवरचा संपर्क जरी तुटला तरी आरटीडीए प्रणाली ही समांतरपणे काम करते. शिवाय स्थानिक घटनांबद्दल संवाद साधण्यासाठीही फायदेशीर ठरु शकते, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. महत्त्वाचं म्हणजे ही यंत्रणा विजेशिवाय 72 तास चालू शकते, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयानं 406 आणि ठिकाणं निवडली असून त्या ठिकाणी आरटीडीए ही यंत्रणा बसवली जाणार आहे. या 406 ठिकाणी लाऊडस्पीकरच्या मदतीने ग्रामस्थांना सूचना दिल्या जाऊ शकतात, असंही सांगितलं जातंय. रत्नागिरी सारख्या डोंगराळ जिल्ह्यात मोबाईल नेटवर्क आणि वीजपुरवठा सातत्यानं खंडित होणाऱ्या जिल्ह्यात ही यंत्रणा महत्त्वपूर्ण भूमिका बजवेल. दरम्यान, याआधी पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खोऱ्याही अशीच सिस्टम बसवण्यात आलेली होती.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.